Pune PMC News | महापालिकेच्या विद्युत विभागाचा अजब कारभार; मेट्रोचे भूमिपूजन झाल्यानंतरही मार्गिकेवर उभारले आकर्षक विद्युत पोल आणि फिटींग्ज

अल्पावधीत काम सुरू झाल्यानंतर काढावे लागले ७६ लाख रुपये किंमतीचे पोल

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही महापालिकेच्या विद्युत विभागाने मेट्रोच्या वारजे ते रामवाडी मार्गीकेवर बंडगार्डन रस्त्यावर पुर्वीच्या प्रभाग क्र. २१ व सध्याच्या प्रभाग क्र. २० मधील येरवडा येथील पुलापासून जहांगीर हॉस्पीटलपर्यंत महागडे विद्युत पोल आणि फिटिंग्ज बसविल्या. तब्बल ७६ लाख लाख रुपये खर्चून बसविण्यात आलेले हे पोल व फिटींग्ज मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर काढून टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेच्या विद्युत विभागाने सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन प्रभाग क्र. २१ व नंतरच्या प्रभाग क्र. २० मधील येरवडा पूल ते जहांगीर हॉस्पीटल दरम्यानच्या बंडगार्डन रस्त्यावर विद्युत पोल आणि फिटींग्ज बसविण्याची निविदा काढली होती. ऑक्टोबरमध्ये ही निविदा उघडण्यात आली. या कामाची वर्कऑर्डर १७ डिसेंबर २०१६ मध्ये मोरेश्‍वर इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराला देण्यात आली. अवघ्या दोन महिन्यांत करायच्या या कामाची रनिंग बिले मात्र फेब्रुवारी २०१७ पासून अगदी मार्च २०१८ मध्ये देण्यात आली.

 

विशेष असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारजे ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन २२ नोव्हेंबर २०१६ रोजी झाले होते. मेट्रोचा मार्ग आणि आराखडा मान्य झाल्यानंतरच हे उदघाटन झाले होते. येथील पोलवर बसविण्यात आलेली फुलपाखरांच्या आकाराची फिटींग्ज २४ हजार ६९० या दराने घेण्यात आली होती. प्रत्यक्षात महापालिकेच्या डीसीआरनुसार या फिटींग्जचा दर ३ हजार ४६० रुपये होता. (Pune PMC News)

दरम्यान, भूमिपूजनानंतर महामेट्रोने कामही हाती घेतले. हे काम करत असताना या मार्गीकेवर बसविण्यात आलेले सर्व पोल काढून टाकण्यात आले.
दरम्यान, राज्य शासनाच्या लेखापरिक्षकांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढून याप्रकरणी खुलासा मागविला.
यावर महापालिकेच्या विद्युत विभागाने हास्यास्पद उत्तर दिले.
या मार्गावर व्हीआयपी वाहतूक असल्याने आकर्षक महागड्या फिटींग्ज बसविण्यात आल्या.
तसेच मेट्रो जमिनीखालून होणार की जमिनीवरून होणार याची माहिती नसल्याने हे काम करण्यात आल्याचे लेखी स्पष्टीकरण लेखा परिक्षकांना पाठविले.
लेखा परिक्षकांनी विद्युत विभागाचे हे स्पष्टीकरण फेटाळताना मेट्रो प्रकल्पाचा आराखडा मंजुरीनंतरही
महापालिकेच्या ७६ लाख ७१ हजार रुपयांची उधळपट्टी केल्याचा ठपका ठेवला आहे.

 

 

Web Title :-  Pune PMC News | Strange administration of municipal electricity department; Attractive electrical poles and fittings erected on the route even after the Bhoomipuja of Metro

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य