Pune PMC News | वेतन संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण; वेतन वेळेत होणार ! पगार बिल क्लार्क आणि सर्व ऑडीटर्सची शनिवार, रविवारची सुट्टी कॅन्सल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | सातव्या वेतन आयोगातील (7th Pay Commission) वाढीनुसार महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे जुलै महिन्याचे वेतन वेळेत अर्थात ७ ऑगस्टलाच बँकेत जमा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पगार बिलांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या सर्वच कार्यालयातील बिल लेखनिक आणि वरिष्ठ कर्मचार्‍यांची शनिवार आणि रविवारची सुट्टी कॅन्सल करण्यात आली आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेकडे सुमारे १८ हजार अधिकारी व कर्मचारी काम करतात. महापालिका (Municipal Corporation) भवनमधील सर्व कार्यालये, १५ क्षेत्रिय कार्यालये, पाच परिमंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची पगार बिले संबधित विभागांच्या कार्यालयातूनच काढण्यात येतात. पगार बिलांसाठी महापालिकेच्या सांख्यिकी व संगणक विभागाने स्वतंत्र प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीचाच वापर करून प्रत्येक महिन्याच्या १ ते ६ तारखेपर्यंत पगारबिले तयार करून ७ तारखेला वेतन संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बँकखात्यात जमा केले जाते. (Pune PMC News)

दरम्यान, जुलै महिन्याच्या पगारबिलाचे काम सुरू असतानाच संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे भलताच गोंधळ उडाला आहे. विशेष असे की वेतनासाठी दोनच दिवसांचा अवधी उरला असून यंदा सात तारिखही रविवारीच आल्याने लेखा परिक्षक विभाग टेन्शनमध्ये आला आहे. संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे सर्व पगार बिले तपासूनच वेतन जमा करावे लागणार असल्याने मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांनी सर्व विभागातील पगार बिल लेखनिक व त्यांचे वरिष्ठ तसेच ऑडीट विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून पगार बिलांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title :- Pune PMC News | technical difficulty in the payroll computer system; Salary will be on time! Salary Bill Clark and all auditors Saturday, Sunday holiday cancelled

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Soya For Male Fertility | सोया खाल्ल्याने पुरुषांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो का? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

 

Shashikant Shinde | ‘…म्हणूनच भाजपने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल, ते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत’, शशिकांत शिदेंनी सांगितलं ‘प्लॅनिंग’

 

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या विरोधात कोण बोलतो’ असे म्हणत टोळक्याचा राडा, कोयत्याने तरुणावर वार