Pune PMC News | सॅनेटरी पॅड आणि डायपर्सवर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प 1 ऑगस्टपासून सुरू करणार

आशा राउत, घन कचरा व्यवस्थापन प्रमुख, महापालिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune PMC News | शहरातील कचर्‍यामध्ये आढळणार्‍या सॅनेटरी पॅड आणि डायपर (Sanitary Pads And Diapers) वर प्रक्रिया करण्यासाठी प्रॉक्टर ऍन्ड गँबल (Procter & Gamble) कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येणारा प्रकल्प येत्या १ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे. हडपसर (Hadapsar) येथील महापालिकेच्या रोकेम कंपनीच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात साडेचार टन क्षमतेचे हे युनिट बसविण्यात येणार आहे. (Pune PMC News)

 

शहरामध्ये गोळा होणार्‍या सुक्या आणि ओल्या कचर्‍यासोबतच मेडीकल वेस्ट, राडारोडा आणि थर्माकोलच्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प महापालिकेने गेल्या काही वर्षात सुरू केले आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने अंत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणार्‍या सॅनेटरी वेस्टवर देखिल प्रक्रिया करण्यासाठी यापुर्वी इन्सिनेटर प्लांट उभारले होते. परंतू हे इन्सिनेटर प्लांट फार काळ चालू शकले नाहीत. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षापासून शहरात दररोज निर्माण होणारा सॅनेटरी आणि डायपर्सचा कचरा हा सध्या सुक्या कचर्‍यासोबत प्रक्रिया केला जातो. यामुळे कचरा गोळा करण्यापासून त्याची विल्हेवाट लावणार्‍या कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. (Pune PMC News)

या पार्श्‍वभूमीवर प्रॉक्टर अँन्ड गँबल या सॅनेटरी पॅड आणि डायपरसोबतच आरोग्यासंदर्भातील उत्पादने निर्माण करणार्‍या कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून सॅनेटरी पॅड आणि डायपरवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली असून त्याला स्थायी समितीने सुमारे अडीच वर्षांपुर्वी मान्यता देखिल दिली आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने हडपसर येथील रोकेम कंपनीच्या प्लँटच्या आवारातील महापालिकेची जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्व विभागांच्या परवानग्यांनंतर या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाची तपासणी सुरू असून येत्या १ ऑगस्टपासून प्रकल्प कार्यन्वीत करण्यात येईल, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राउत (Asha Raut PMC) यांनी दिली.

 

सॅनेटरी पॅड आणि डायपरवर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून सेल्युलोज,
प्लास्टिक आणि फायबर निघणार आहे. या घटकांचा वापर अन्य उत्पादनांसाठी करण्यात येतो.
साधारण एक टन पॅडस व डायपरमधून जवळपास ३०० किलो सेल्युलोज,
प्लास्टिक आणि फायबर मिळते. रासायनिक प्रक्रियेदरम्यान यामध्ये सुमारे ३०० ते ३५० किलो घटक हे पाणी असते. उर्वरीत ३५० ते ४५० किलो रिजेक्ट निघते, ते लँडफिलिंगसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती आशा राउत यांनी दिली.

 

सॅनेटरी पॅड, डायपर स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी विशेष मोहीम

सध्या घराघरांतून गोळा होणार्‍या कचर्‍यामध्ये सुक्या कचर्‍यामध्येच सॅनेटरी पॅड
आणि डायपर गोळा होतात. नागरिकांनी त्यांच्याकडे कचरा गोळा करण्यासाठी
येणार्‍या कर्मचार्‍यांना कागदामध्ये स्वतंत्रपणे गुंडाळून
या वस्तू वेगळया करून दिल्यास संकलन करणे अधिकच सोपे होउ शकते.
कचरा गोळा करणार्‍या मोठ्या घंटागाड्यांना हे पॅडस् स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी
लाल रंगाच्या पेट्या बसविण्यात आल्या आहेत. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अंत्यंत महत्वपुर्ण असलेल्या या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे आणि कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन घन कचरा विभागाच्या प्रमुख आशा राउत यांनी केले आहे.

 

 

Web Title : Pune PMC News | The project to process sanitary pads and diapers will start from August 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Political News | अजित पवारांकडे अर्थखाते, पण निर्णय…, शिवसेनेची सावध भूमिका

Jawan Movie Preview | जवानच्या प्रिव्ह्युमध्ये दिसणारा शाहरुख खानच्या मस्तकावरचा हा टॅटू नक्की आहे तरी काय?

Jawan Movie Preview | जवानच्या प्रिव्ह्युमध्ये दिसणारा शाहरुख खानच्या मस्तकावरचा हा टॅटू नक्की आहे तरी काय?