Mahavikas Aghadi | मोठी बातमी! महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा, ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

मुंबई : राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha Election) ४८ जागांच्या वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मोठा तिढा निर्माण झाला आहे. लोकसभेच्या २३ जागांची मागणी ठाकरे गटाने (Thackeray Groups) केली होती. परंतु, काँग्रेसने (Congress) ही मागणी अमान्य केली आहे. जागा वाटपाबाबत ठाकरे गटाने मांडलेला प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. (Mahavikas Aghadi)

लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात नुकतीस महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले की,
महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीत (NCP) फूट पडली आहे.
त्यामुळे स्थिर मतांचा एकमेव जुना पक्ष आता काँग्रेस आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Congress leader Ashok Chavan) म्हणाले की, पक्षांमध्ये चर्चेची गरज आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी, शिवसेनेची २३ जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात संजय निरुपम यांच्या वक्तव्य देण्यात आले आहे. संजय निरुपम यांनी म्हटले आहे की,
शिवसेनेची २ गटांत विभागणी झाली असून ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली होती.
परंतु, त्यांच्यातील बरेच सदस्य एकनाथ शिंदे गटाकडे आहेत.
त्यामुळे ठाकरे गटाकडे पुरेसे उमेदवार नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. (Mahavikas Aghadi)

संजय निरुपम यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीतील नेत्यांनी जागावाटपाबाबत संघर्ष टाळावा.
ठाकरे गट २३ जागांची मागणी करू शकते. पण या जागांचे ते काय करणार? शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे
गटात (Eknath Shinde Group) आहेत. त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत ठाकरे गटातच मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies To Remove Winter Tan From Lips | हिवाळ्यात ओठांचे टॅनिंग झाले असेल, तर गुलाबी ओठांसाठी अवलंबा हे ५ घरगुती उपाय

Soha Ali Khan Exercise | फिट राहण्यासाठी अभिनेत्री सोहा अली खान करते ‘ही’ एक्सरसाइज, जाणून घ्या तिचे ‘फिटनेस सीक्रेट’

Juice in Winters | हिवाळ्यात ज्यूस पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाडी देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींची 35 लाखांची फसवणूक, वाघोली परिसरातील प्रकार