Pune PMC News | अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट, बार व अन्य बाबींबाबत तक्रार देण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी वॉररूम ! 8308059999 या WhatsApp क्रमांकावर तक्रार करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरात अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट, बार, खानावळ इत्यादी व्यवसाय सुरु असून, रात्री उशिरा ते पहाटे पर्यंत सुरु असतात. त्यामध्ये कर्णकर्कश आवाजात म्युझिक सिस्टम सुरु असल्याने, निवासी भागातील शांतता भंग होत आहे. या सर्व गोष्टीना चाप बसावा तसेच सदर निवासी मिळकती मध्ये बिगर निवारी व्यवसाय करून पुणे महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कर आकारणी (PMC Taxation) व कर संकलन कार्यालय (PMC Tax Collection Office), पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांकरिता एक वॉररूम (PMC War Room) तयार करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना याबाबत तक्रार करण्यासाठी पालिकेकडून (Pune PMC News) व्हॉट्सअॅप क्रमांक 8308059999 देखील कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी केले आहे.

 

 

पुणे महानगरपालिका (Pune PMC News) कार्यक्षेत्रात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या निवासी,
बिगर निवासी, मोकळ्या जागा इत्यादी मिळकती तसेच वापरात बदल होणाऱ्या मिळकतींची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार त्या-त्या वर्षाच्या प्रचलित दरसूची नुसार आकारणी करून संबंधित मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्यात येते.

 

पुणे शहरामध्ये निवासी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरु आहेत.
निवासी मिळकतीमध्ये बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता, वापरात बदल करून,
अनधिकृत हॉटेल (Unauthorized hotels), रेस्टॉरंट (Restaurants), बार (Bar),
खानावळ इत्यादी व्यवसाय सुरु असून, रात्री उशिरा ते पहाटे पर्यंत सुरु असतात त्यामध्ये
कर्णकर्कश आवाजात म्युझिक सिस्टम सुरु असल्याने, निवासी भागातील शांतता भंग होत आहे.
तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जात
असल्यामुळे पार्किंगचा (Parking) तसेच वाहतुकीचा (Traffic) प्रश्न निर्माण होत आहे,
याबाबत दैनिक वृत्तपत्रात बातम्या छापून येत आहेत. तसेच काही लोकप्रतिनिधी,
सामाजिक संस्था यांनी देखील खात्याकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.

 

वरील नमूद सर्व गोष्टी हॉटेल, पब, रेस्टॉरंटमध्ये अनधिकृतपणे सर्रास सुरु असल्याने या सर्व गोष्टीना चाप
बसावा तसेच सदर निवासी मिळकती मध्ये बिगर निवारी व्यवसाय करून पुणे महानगरपालिकेचे
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कर आकारणी व कर संकलन कार्यालय,
पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरीकाकरिता एक वॉररूम तयार करण्यात आली आहे.
यामध्ये गृह निर्माण संकुलांमध्ये निवासी सदनिके व्यतिरिक्त कार्यालयीन वापर,
व्यावसायिक वापर उदा ऑफिस, ब्युटीपार्लर, क्लिनिक अथवा निवासी मिळकतीमध्ये अनधिकृत हॉटेलचा
वापर सुरु असल्यास अथवा एखा‌द्या मिळकतीची कर आकारणी केली नसल्यास, अशा मिळकतींची माहिती
व्हॉट्सअॅप क्रमांक 8308059999 यावर कळवावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 

अशा मिळकतींचा पत्ता व लोकेशन पुणे महानगरपालिकेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळविल्यास,
त्याची दखल कर आकारणी व कर संकलन विभागाकडून घेतली जाणार आहे.

 

Web Title : Pune PMC News | Warroom for citizens from Pune Municipal Corporation to complain about
unauthorized hotels, restaurants, bars and other matters! Report on WhatsApp number 8308059999

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा