Pune PMC Pre-Monsoon Works | मान्सूनपूर्व 100 टक्के नाले सफाई, पुणे महापालिकेचा दावा; नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपाने जारी केले ‘हे’ 2 WhatsApp नंबर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Pre-Monsoon Works | पुणे महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामे (Pre-Monsoon Works In Pune) करण्यात आली असून नालेसफाईची कामे 100 टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून (PMC Administration) करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका शहरातील नाले, गटारी, पावसाळी गटार, चेंबर आदींची साफसफाई करुन राडारोडा, तसचे डांबरी खड्डे बुजवण्याचे काम करते. (Pune PMC Pre-Monsoon Works)

 

पुणे महानगरपालिकेमार्फत नाल्यातील 95 क्रिटिकल स्पॉटची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच 382 कल्व्हर्टसची 100 टक्के साफसफाई पुर्ण करण्यात आली आहे. एकूण नाल्यांच्या लांबी पैकी आवश्यक असणारी 165 कि.मी. लांबीच्या नाल्यांची साफसफाई (Drain Cleaning In Pune) व गाळ काढणे तसेच काही ठिकाणी खोलीकरण करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

याशिवाय पावसाळ्यात शहरातील विविध रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी दक्षता घेण्यात येत असून सध्या असलेल्या चेंबर्स पैकी आवश्यक असणारे 48 हजार चेंबर्समधील गाळ काढण्यात आला आहे. तर 184 कि.मी. लांबीच्या पावसाळी लाईन साफ करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावर पावसाचे पाणी साचु नये यासाठी फुटपाथच्या कडेने नवीन पावसाळी चेंबर्स तयार करुन ते पावसाळी लाईनला जोडण्याचे काम सध्या सुरु आहे.

पावसाळ्यात देखील ही साफसफाई सुरु राहणार आहे. यासाठी पुणे मनपा भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष (Disaster Management Room) स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी 9689930531 आणि 9689935462 या WhatsApp क्रमांकावर 24X7 नागरिकांना तक्रार नोंदवता येणार आहे.
तसेच रात्रीच्यावेळी येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन निवारण करण्यासाठी कनिष्ठ/शाखा अभियंता यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करुन
बिगारी सेवक रात्रपाळीत ठेवण्यात आला असल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 

Web Title :  Pune PMC Pre-Monsoon Works | 100 percent drain cleaning before Monsoon, claim of
Pune Municipal Corporation; PMC Issue 2 WhatsApp numbers for citizen’s complaints

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा