Pune PMC Property Tax | पुणेकरांना घरपट्टी 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व सावकारी व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

पुणे : Pune PMC Property Tax | पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना1970 सालापासून 40% घरपट्टी सूट मिळत होती. तथापि गेली पाच वर्ष ती बंद करण्यात आली आहे. पुणेकरांना मिळणारी 40% सवलत पुन्हा सुरू ठेवावी यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली. काँग्रेस पक्षाने (Congress Pune) सहीची मोहीम राबवली. देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना निवेदन दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पत्र पाठविले. परंतु पाच वर्षे त्यांनी दुर्लक्ष केले होते. कसब्यात (Pune Kasba Bypoll) भाजपाचा (BJP Pune) पराभव झाल्यावर पालकमंत्र्यांनी मागील महिन्यात याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन ती पूर्ववत चालू ठेवावी अशी मागणी केली. (Pune PMC Property Tax)

परंतु कॅबिनेटमध्ये लगेच निर्णय घेतो असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा एक महिना लोटला पुणेकरांना याचा आर्थिक बोजा नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी पुणेकर नागरिकांच्या वतीने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) व आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या नेतृत्वाखाली तुळशीबाग राम मंदिरत, राज्य सरकारला 40% पट्टीतील सवलत सुरू ठेवावी व सावकारी व्याज कमी करावे त्यासाठी आरती करून साकडे घालण्यात आले. यावेळी मोहन जोशी म्हणाले की पुणेकर नागरिकांच्या साठी आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केलीत. मग ते रस्त्यावरील खड्ड्यांच्या असो व पाणीपुरवठा बाबत असो सरकारचे नेतृत्व करणारे नुकतेच आयोध्या वारी करून आलेत आमची म्हणजेच पुण्याचे तुळशीबागेतील राम मंदिर आहे. (Pune PMC Property Tax)

 

आमदार यांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले भरमसाठ टॅक्स लावून
ते छळत आहेत.40% सवलती सोबत 500 स्वे. फीट घरांना टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरणार असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस संजय बालगुडे (Sajay Balgude) यांनी केले होते.
यावेळी मंदिरात रामाची आरती करण्यात करिता आरतीला 40 ते 50 कार्यकर्ते हजर होते असे पत्रक संजय बानगुडे
यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

Web Title :- Pune PMC Property Tax | Prabhu Ramchandra to restore the 40% discount on house rents to Pune residents and reduce Pune PMC Property Tax

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया