Pune PMC Stamp Duty & GST | समाविष्ट 34 गावांतील मुद्रांक शुल्क व जीएसटीच्या हिश्श्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Stamp Duty & GST | महापालिका हद्दीमध्ये २०१७ नंतर समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील व्यवहारांच्या मुद्रांक शुल्काच्या एक टक्के रक्कम तसेच जीएसटीची रक्कम महापालिकेला देण्याबाबत राज्य शासनासोबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Stamp Duty & GST)

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाली. यानंतर २०२० मध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये महापालिकेने मिळकत कराची आकारणी सुरू केली आहे. दरम्यान, या गावांतील नोंदणीकृत व्यवहारांवरील मुद्रांक शुल्काच्या एक टक्का रक्कम महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे. यासोबतच जुलै २०१७ पासून स्थानीक संस्थां कराऐवजी जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेला स्थानीक संस्था कराऐवजी केंद्र आणि राज्य सरकारकडून शहरांत झालेल्या उलाढालीच्या प्रमाणात जीएसटीचा हिस्सा मिळतो. परंतू २०१७ पासून या समाविष्ट गावांतील जीएसटीचा हिस्सा देखिल मिळालेला नाही. (Pune PMC Stamp Duty & GST)

महापालिका हद्दीचा विस्तार झाल्यानंतर समाविष्ट गावांमध्ये सर्वाधीक जमीनीचे व्यवहार आणि विकास प्रकल्प उभे राहात आहेत. महापालिकेला २०१७ पासून मुद्रांक शुल्काचा तसेच जीएसटीच्या हिश्श्यापोटी उत्पन्न सुरू झाल्यास दरवर्षी महापालिकेच्या उत्पन्नात साधारण २०० कोटी रुपयांची वाढ होईल. तसेच यापुर्वीच्या थकबाकीपोटी देखिल काही कोटी रुपये रक्कम मिळेल. गावांमधील विकासकामांसाठी या निधीचा चांगला उपयोग होईल, असा दावा अधिकारी वर्गाकडून करण्यात येत असल्याबाबत ‘आज का आनंद’ ने सर्वात प्रथम वृत्त प्रकाशित केले आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे विचारणा केली असता,
ते म्हणाले समाविष्ट गावांतील मिळकत कराचा आढावा घेताना मुद्रांक शुल्क
तसेच जीएसटी पोटीच्या हिश्श्याचे उत्पन्न महापालिकेला मिळावे
यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच शासनाला पत्र व्यवहार करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना 40 टक्के कर सवलत देण्यासाठी 31
जानेवारीपर्यंत पीटी 3 फॉर्म सादर करण्याची मुदत

Zika Virus | अलर्ट! पुण्यासह राज्यात आढळले झिकाचे ५ रुग्ण; सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर