Pune PMC Property Tax | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना 40 टक्के कर सवलत देण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत पीटी 3 फॉर्म सादर करण्याची मुदत

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) २०२१ साली समाविष्ठ केलेल्या २३ गावांतील मिळकतींना मिळकत कर आकारणी सुरु करण्यात आली आहे. या गावांतील निवासी मिळकतींना करात देण्यात येणारी ४० टक्के सवलत मिळविण्यासाठी पीटी ३ अर्ज (PT 3 Form PMC ) भरणे आवश्यक आहे. त्याकरीता ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Pune PMC Property Tax)

महापालिकेने समाविष्ठ गावांतील मिळकतींच्या नोंदी करण्यास सुरुवात केली आहे. हे काम ८० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. मांजरी, वाघोरी, सुस – म्हाळुंगे, बावधन आदी नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झालेल्या गावांत मिळकतींची संख्या अधिक आहे. यामुळे येथील नोंदीची संख्या तुलनेत करण्यास वेळ लागत आहे. ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीनुसार मिळकतींवर कर आकारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत गाव समाविष्ठ झाल्यानंतरच्या मिळकतींवर कर आकारणी केली जात आहे. ग्रामपंचायतीकडील नोंदीनुसार मिळकतींवर कर आकारणी करण्यासाठी प्रत्येक मिळकत शोधुन, त्यावर नोटीस चिटकवून सुनावणी घेतली जाते. त्यानंतर कर आकारणी केली जाते. ज्या गावांत मिळकतींची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी हे काम ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. परंतु मोठ्या संख्येने बांधकामे झालेल्या गावांतील मिळकतींवर आकारणी करण्याचे काम ५० टक्क्याच्या आसपास आहे, असे अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar ) यांनी सांगितले. (Pune PMC Property Tax)

समाविष्ठ २३ गावांकरीता ३१ जानेवारीची मुदत

ADV

समाविष्ठ गावांतील मिळकतींना टप्प्या टप्प्याने कर आकारणी केली जाणार आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींना पुन्हा मिळकत करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महापालिकेकडून मिळकतदारांना या सवलतीसाठी पीटी ३ हा अर्ज भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले. समाविष्ठ गावांतील निवासी मिळकतींनाही चाळीस टक्के सवलत दिली जाणार आहे. याकरीता या गावांतील मिळकतदारांनाही पीटी ३ अर्ज भरून द्यावा लागणार आहे. येथील मिळकतदारांना मिळकत करातील सवलतीविषयी अधिक माहीती नाही. तसेच मिळकत कर आकारणी केल्यानंतर बिले मिळण्यास लागणारा कालावधी आदीचा विचार करून महापालिका प्रशासनाने समाविष्ठ तेवीस गावांतील मिळकतींना सवलतीकरीता पीटी ३ अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मुदत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

इतर भागांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

समाविष्ठ तेवीस गावे वगळता इतर भागातील मिळकतींना सवलत मिळविण्यासाठी पीटी३ अर्ज भरून देण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. ती मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

२३ गावातील मिळकतींची स्थिती

निवासी मिळकती – १, ८२, १६४
बिगरनिवासी मिळकती – १४,३५१
मोकळ्या जागा – ७००
मिश्र – ३७१९

एकूण मिळकती – २,००,९३४

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On Amit Shah | अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला समाचार, राज ठाकरेंनी सुनावले

Pune Pimpri Crime News | घरगुती कारणावरुन वयस्कर आईचा खून, मुलाला अटक; देहूरोड परिसरातील घटना

‘आमच्या सोबत का फिरत नाही?’ म्हणत दोन तरुणांना मारहाण, आंबेगाव मधील घटना

Loksabha Election 2024 | कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण? मातोश्रीवर इच्छूकांची बैठक, हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?