Pune PMC Water Supply Department | पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानेही प्रथमच 100 कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडत 121.68 कोटी रुपये मिळविले उत्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply Department | महापालिकेच्या उत्पन्नामध्ये बांधकाम विभाग (PMC Building Development Permission Department) आणि मिळकतकर विभागाने (PMC Property Tax Department) अभूतपूर्व योगदान दिले असतानाच पाणी पुरवठा विभागानेही यंदा कोटीकोटीच्या उड्डाणे घेतली आहेत. यंदा प्रथमच पाणी पुरवठा विभागाने (Pune Water Supply) 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडत 121 कोटी 68 लाख रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे. सरकारी कार्यालयांकडील थकबाकी वसुलीचा यामध्ये मोठा वाटा असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी सांगितले. (Pune PMC Water Supply Department)

 

नुकतेच संपलेल्या आर्थिक वर्षात महापालिकेने प्रथमच 6 हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविले आहे. यामध्ये बांधकाम विभागाचे 2002 कोटी, मिळकत कराचे 1850 कोटी , जीएसटी चे 1845 कोटी आणि मुद्रांक शुल्क (Stamp Duty), एलबीटी (LTB) आणि मालमत्ता विभागाच्या सुमारे 200 कोटी रुपयांचा समावेश आहे. या उत्पन्नात पाणी पुरवठा विभागाने देखील 121. 68 कोटी रुपयांची भर घातली आहे. पाणी पट्टी विभागाचे एका वर्षातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. यामध्ये प्रामुख्याने मीटर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या अस्थापणाकडील थकबाकी वसुली मुळे हे उत्पन्न वाढले आहे. (Pune PMC Water Supply Department)

यासंदर्भात माहिती देताना अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की पाणी पुरवठा विभागाला आतापर्यंत दरवर्षी 80 ते 90 कोटी रुपये उत्पन्न मिळते.
मागील वर्षी 96 कोटी तर त्या अगोदरच्या वर्षी 92 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
यावर्षी उत्पन्न वाढीसाठी लोक अदालत, अभय योजना राबविण्यात आली होती. तसेच शासकीय कार्यालयांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी अभियंते आणि मीटर निरीक्षकांनी विशेष मेहनत घेतली. दोन्ही कॅन्टोन्मेंट (Pune And Khadki Cantonment Board) , महावितरण (MSEDCL), पोलीस विभागासोबत (Pune Police) अन्य कार्यालयांकडे असलेली थकबाकी बऱ्या पैकी वसूल करण्यात आली.

 

१२१.६८ कोटी उत्पन्न प्राप्त करून मनपा चे उत्पन्न वाढविण्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे.
हा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पाणी पुरवठा विभागाचा उच्चांक आहे (मागील सर्वाधिक उत्पन्नापेपेक्षा २०% हुन अधिक).
माझ्या मीटर रीडर पासून अधीक्षक अभियंत्या पर्यंत सर्व जणांनी वर्षभर प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्याचे हे फळ आहे.

 

 

Web Title :- Pune PMC Water Supply Department | Pune Municipal Corporations water supply department also crossed the 100 crore revenue mark for the first time and earned 121.68 crore rupees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा