Pune PMPML Bus | पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे बाणेर रस्त्यावरील पीएमपीएमएल बसेसच्या संचलनात तात्पुरता बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus | पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्पाची (Pune Metro Project) कामे सुरु आहेत. पुणे मेट्रोचे शिवाजीनगर (Shivajinagar) ते हिंजवडी माण फेज-3 (Hinjewadi Man Phase-3) या मार्गावर काम सुरु आहे. त्यामुळे सोमेश्वर वाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल बाणेर पर्यंतच्या कामाकरीता 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या चार दिवसांमध्ये पीएमपीएल बसेसच्या (Pune PMPML Bus) संचलनात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

मेट्रोच्या कामामुळे 12 ते 15 ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीमध्ये बाणेर रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बाणेर रस्त्यावरुन (Baner Road) संचलनात असलेले बस मार्ग क्रमांक 114, 208, 256, 258 व 360 या बस मार्गांच्या (Pune PMPML Bus) वाहतुकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे.

बस मार्ग 114, 208, 256, 258 व 360 या बस मार्गांवरील बसेस बाणेरकडे जाताना
बाणेर फाटा चौकातून उजवीकडून वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय (Aundh ITI),
परिहार चौकातून (Parihar Chowk) पुढे डावीकडे वळून डीपी रोडने आंबेडकर चौक
येथून उजवीकडे वळून मिडी पॉईंट हॉस्पिटल पासून डावीकडे वळण घेऊन लिंक रोडने सरळ पुढे ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यापासून पुढे पूर्ववत बस मार्गाने बसेसचे संचलन सुरु राहील.

हा बदल चार दिवसांसाठी असून 16 ऑगस्ट पासून सर्व बस मार्ग पूर्ववत संचलनात राहील,
असे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कळवण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Protein | अंडी-मटण न खाता सुद्धा शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन, मार्केटमधून खरेदी करा ‘ही’ ४ फळे