Pune PMPML News | गणेशोत्सवात शिवाजी आणि बाजीराव रस्त्यावरील ‘पुण्यदशम’ बस सेवा अडचणीत येण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML News | गणेशोत्सवामध्ये मध्यवर्ती शहरातील रस्ते बंद झाले तर ‘पुण्यदशम’ बसेसचे संचलन कसे करायचे असा प्रश्‍न पीएमपीएमएल प्रशासनापुढे उभा राहीला आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज स्वत: या बसेसचे प्रमुख दोन मार्ग शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्याची पाहाणी केली असून लवकरच या रुटचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. (Pune PMPML News)

 

मध्यवर्ती शहरातील वाहतुक कोंडीतून प्रवाशांना गतीने शहरातून बाहेर पडता यावे अथवा शहरात येता यावे यासाठी महाापलिकेने मागीलवर्षी पुण्यदशम ही मिनिबस सेवा सुरू केली आहे. या बसेस प्रामुख्याने स्वारगेट ते शिवाजीनगर, स्वारगेट ते पुणे स्टेशन या मार्गावर सोडण्यात येत आहेत. ही सेवा सुरू करताना मध्यवर्ती शहरातील मोठ्या आकाराच्या बहुतांश बसेस बंद केल्या असून केवळ लॉंग रुटच्या काही बसेस सुरू ठेवल्या आहेत. (Pune PMPML News)

परंतू या बसेस सुरू केल्यानंतर मागीलवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचे सावट दूर होउन सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. राज्य शासनानेही निबर्र्ंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केल्याने दोन वर्षांनी शहरात जोरदार गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील जुनी मंडळे मध्यवर्ती भागातच असल्याने गणेशोत्सवाच्या काळात शिवाजी रस्ता बंद राहाण्याची शक्यता आहे. तसेच बाजीराव रस्त्यावरही मोठ्याप्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहाता शिवाजीनगर हून स्वारगेट कडे जाणार्‍या आणि स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाणार्‍या पुण्यदशमच्या सेवेत अडचणी निर्माण होणार आहेत. शहराच्या विविध भागातून स्वारगेट अथवा शिवाजीनगर येथून ये-जा करणार्‍या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.

 

यासंदर्भात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे विचारणा केली असता,
ते म्हणाले संभाव्य अडचणी लक्षात घेउन आज शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्याची पाहाणी केली.
येत्या दोन तीन दिवसांत पर्यायी मार्गांचे नियोजन जाहीर करण्यात येईल.

 

Web Title :- Pune PMPML News | The ‘Punyadasham’ bus service on
Shivaji and Bajirao roads is likely to be disrupted during Ganeshotsav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा