Pune Police | बदली होऊनही गैरहजर राहणारे पुण्यातील 3 पोलीस अंमलदार निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | मुख्यालयातून कधी एकदा बदली होऊन आपण पोलीस ठाण्यात जातो, असे पोलीस मुख्यालयात असलेल्यांना वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. असे असताना मुख्यालयातून पोलीस ठाण्यात बदली झाली असतानाही बदलीच्या ठिकाणी पावणेदोन वर्षाहून अधिक काळ हजर न झालेल्या पोलीस अंमलदारांना निलंबित (Pune Policeman Suspended) करण्यात आले आहे. (Pune Police)

 

पोलीस नाईक युवराज बाळकृष्ण बडदे (Yuvraj Balkrishna Badde) असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. बडदे हे ६ ऑगस्ट २०२० पासून सीक रजेवर आहेत. रजेच्या काळात त्यांची शिवाजीनगर (Shivaji Nagar Police HQ) येथील पोलीस मुख्यालयातून कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) बदली करण्यात आली. असे असताना तो अद्यापपर्यंत गैर हजर राहिला. तसेच कोणत्याही प्रकारे पोलीस ठाण्यात सुचित केले नाही. अगर आजारपणाची वैध कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे १ वर्ष ९ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी गैरहजर राहिल्याने बडदे याला निलंबित करण्यात आले आहे. (Puen Police)

 

शिवाजीनगर कोर्ट (Shivaji Nagar Court Pune) आवार येथून कोंढवा पोलीस ठाण्यात बदली झालेली असताना १० महिन्यांपेक्षा अधिक काळ गैर हजर राहिलेले पोलीस नाईक सुधीर सूर्यकांत लोखंडे (Sudhir Suryakant Lokhande) यांना निलंबित करण्यात आले आहे. कोर्ट आवार येथे नेमणूकीला असताना १ जुलै २०२१ पासून लोखंडे सीक रजेवर आहेत. त्यांची २६ जुलै २०२१ रोजी कोंढवा येथे बदली करण्यात आली़ तरी ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

३० जुलै २०२१ पासून सीक रजेवर गेलेल्या पोलीस नाईक हेमंत कुंभार (Hemant Kumbhar) यांना निलंबित करण्यात आले आहे.
हेमंत कुंभार हे हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत़ ते सीक रजेवर गेले आहेत.
त्यांना गेल्या १० महिन्यात ७ वेळा नोटीस बजावूनही ते कर्तव्यावर हजर झाले नाहीत.
अथवा आजारपणाची कोणतीही वैध कागदपत्रे सादर केली नाही़ त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी हे आदेश काढले आहेत.

 

Web Title :- Pune Police | 3 Pune Policeman suspended for absenteeism

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mukul Madhav Foundation | फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे पालघरच्या आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम

 

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

 

Model Found Dead | 21 वर्षांची प्रसिद्ध मॉडल-अभिनेत्रीचा वाढदिवशी झाला मृत्यू, सुसाईड की मर्डर?