Pune Police | पुणे शहरासह जिल्ह्यात वाहन चोरी करणारे त्रिकुट गजाआड, 10 दुचाकीसह रिक्षा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहन चोरांचा शोध घेत असताना पुणे पोलिसांनी (Pune Police) तिघांना अटक (Arrest) केली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) केलेल्या कारवाईत 10 दुचाकी आणि एक रिक्षा असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ससाणेनगर परिसरात केली.

महेश लक्ष्मण धुमाळ (वय-23, रा. आंबेगाव, दौंड), प्रतीक संदीप काळे (वय-21 रा. केडगाव, दौड) आणि महेश दिलीप जगताप (वय-23 रा. कडेठाण, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी ससाणेनगर परिसरात नंबर नसलेल्या दुचाकीवर एकजण थांबल्याचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने (Sub-Inspectors of Police Saurabh Mane) व अविनाश गोसावी (Avinash Gosavi) यांना दिसून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गाडीबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने पोलिसांना उडवाउडवीची
उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशी दरम्यान त्याने त्याच्या दोन साथिदारांच्या मदतीने पुणे शहर आणि जिल्ह्यात वाहन चोरी
केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्याचे साथीदार वाहन चोरी करण्यासाठी दुसरीकडे
गेल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितनुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pune police arrested three two wheelar thief recover 10 two wheelar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update