Pune Police Bandobast | पुणे शहरातील ज्यू धर्मियांच्या प्रर्थनास्थळ परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Bandobast | इस्त्राइल आणि हमास मधील युद्ध विध्वंसक वळणावर येऊन ठेपलं आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटले आहे. संभाव्य घातपाती कारवाया टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील ज्यु धर्मियांचे वास्तव्य असलेल्या परिसरातील तसेच त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या परिसरातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी प्रार्थनास्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले. (Pune Police Bandobast)

पुणे शहरातील लष्कर, कोरेगाव पार्क, वानवडी या भागात ज्यु धर्मीय मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या भागात त्यांचे प्रार्थनास्थळे आहेत. ज्यु धर्मीयांचे लष्कर भागातील लाल देऊळ हे प्रार्थना स्थळ प्रसिद्ध आहे. या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पुणे शहरातील ज्यु धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. (Pune Police Bandobast)

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.
या भागातील बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विविध विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी सुरक्षेचा आढावा घेतला असून,
स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Updates News | नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरातील वाहतूकीत बदल,
जाणून घ्या पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी रस्ते