Pune Police Crime Branch | 8 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Police Crime Branch | व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करुन देखील अधिकच्या पैशांची मागणी करणाऱ्या खासगी सावराविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch ) खंडणी विरोधी पथक दोनने (anti extortion cell) कारवाई केली आहे. खासगी सावकार उमाकांत राजु गायकवाड Umakant Raju Gaikwad (रा. अरणेश्वर, सहकारनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी डिसेंबर 2019 मध्ये खासगी सावकार उमाकांत गायकवाड याच्याकडून 8 टक्क्यांनी 50 हजार रुपये घेतले होते.
गायकवाड याने फिर्यादी यांना पैसे देताना 4 हजार रुपये व्याज कपात करुन उर्वरीत 46 हजार रुपये फिर्यादी यांच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर (Online transfer) केले होते.
त्यानंतर फिर्यादी यांनी गाडकवाड याला प्रति महिना 4 हजार असे एकूण 64 रुपये परत केले होते.

फिर्यादी यांनी पैसे परत करुन देखील आरोपी गायकवाड याने जास्तिच्या पैशांची मागणी केली.
आरोपी गायकवाड याने फिर्यादी यांच्याकडे 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथक दोन कडे तक्रार अर्ज केला.
खंडणी विरोधी पथकाने तक्रार अर्जाची दखल घेत खासगी सावकार उमाकांत गायकवाड
याच्या विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakarnagar Police Station)
महाराष्ट्र सावकारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

 

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अमंलदार संपत औचरे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे,
प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, प्रवीण पडवळ,
चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, महिला पोलीस आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Police Crime Branch | Crime Branch anti-ransom squad cracks down on moneylenders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Metro | मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील गणेश मंडळांनी दिला ‘हा’ इशारा

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त दराने मिळतंय, जाणून घ्या नवीन दर

Modi Cabinet Decision | कॅबिनेटच्या निर्णयाने महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांना सर्वात जास्त फायदा, भारतीय कंपन्या बनतील जागतिक चॅम्पियन!