Pune Police Crime Branch News | दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 6 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch News) युनिट चारच्या (Unit -4) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून 3 लाख 10 हजार रुपयांच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.28) रात्री औंध रोडवरील खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station) जवळ केली.

 

रोहन उर्फ बॉन्ड बाळ्या अशोक म्हेत्रे Rohan Alias Bond Balya Ashok Mhetre (वय-22 रा. शनिनगर, दत्तनगर, कात्रज, पुणे), अक्षय उर्फ वाश्या भारत वाघमारे Akshay Alias Vashya Bharat Waghmare (वय-23 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पुणे शहरातील विविध भागात रात्रीच्या वेळी हॅन्डल लॉक तोडुन दुचाकी चोरल्या होत्या. तसेच नंबर प्लेट काढून दुचाकी वापर होते. (Pune Police Crime Branch News)

 

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांना माहिती मिळाली की पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरणारे दोघेजण औंध रोड वरील खडकी रेल्वे स्टेशन जवळ थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी खडकी रेल्वे स्टेशनजवळ सापळा रचून रोहन आणि अक्षय यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे शहरात रात्रीच्या वेळी बुधवार पेठ, बिबवेवाडी, कात्रज उंन्ड्री, स्वारगटे, दांडेकर पुल येथून वाहने चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून तीन होंन्डा अॅक्टीव्हा, दोन डीओ व एक हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 3 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. आरोपींकडून फरासखाना (Faraskhana Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), पर्वती (Parvati Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS CP Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त,
गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), पोलीस निरीक्षक गणेश माने (PI Ganesha Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav),
महेंद्र पवार, पोलीस अंमलदार शितल शिंदे, अजय गायकवाड, प्रविण भालचिम,
सारस साळवी, मनोज सांगळे, स्वप्निल कांबळे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Police Crime Branch News | Crime branch arrests inn thieves who stole two-wheelers,
6 two-wheelers worth 3 lakhs seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा