Pune Police Crime Branch News | लष्कराचा गणवेश वापरुन फसवणूक करणारा तोतया मेजर अटकेत, महिलांची देखील करायचा फसवणूक

सदर्न कमांडच्या पत्त्यावर बनवून घेतले आधार कार्ड, पॅन कार्ड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | मेजर असल्याचे सांगत लष्करी गणवेश घालून फिरणार्‍या तोतया मेजरला मिलेटरी इंटेलिजन्स Military Intelligence (MI) आणि पुणे शहर पोलिसांच्या (Pun City Police) गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-2 ने Anti Extortion Cell Pune (Pune AEC) संयुक्त कारवाई करून पकडले आहे. त्यांच्याकडे सदर्न कंमाडच्या (Southern Command Pune) पत्त्यावर आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) मिळाले आहे (Pune Police Crime Branch News). दरम्यान, तो विवाह विषयक वेबसाईट्स वर महिलांना लष्करात मेजर असल्याचे भासवून इम्प्रेस करून फसवायचा.

 

प्रशांत भाऊराव पाटील Prashant Bhaurao Patil (वय ३२, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मुळ रा. कुपटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पाटील याच्यावर यापूर्वीही महिलांना लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून त्यांच्यावर अत्याचार (Crime Against Woman) केलेल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून आय फोन (iPhone) सह दोन मोबाईल, भारतीय सैन्य दलाचे दोन गणवेश, इतर साहित्य, तीन आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, गणवेश असलेले चार कलर फोटो असे साहित्य जप्त केले आहेत. (Pune Police Crime Branch News)

याबाबत पोलीस अंमलदार अमोल परशुराम पिलाणे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८४/२३) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करच्या गुप्तचर विभागाने शहर पोलीस दलाला प्रशांत पाटील याच्याविषयी तक्रार अर्ज देऊन कारवाई करण्याविषयी कळविले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar) व त्यांचे सहकारी पाटील याचा शोध घेत होते. तो चिखली (Chikhali) येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला पकडण्यात आले. त्याने खडकी (Khadki) येथील दुकानदार सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफार्म व इतर साहित्य घेऊन पैसे न देता ४ हजार ७०० रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली होती. तो २०१९ पासून आपण लष्करात असल्याचे भासवून तसा गणवेश करुन लोकांची फसवणूक (Fraud Case) करत होता.

 

सदर्न कमांड येथे कार्यरत असल्याचे भासवून लष्कराचा गणवेश घालून त्याने फोटो काढले होते. तसेच त्याचे बनावट आय डी वापरुन सदर्न कमांड येथील मुख्यालयाच्या परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवत होता. सदर्न कमांड येथे रहात नसतानाही या कार्यालयाचा वापर करुन बनावट आधार कार्ड तसेच पॅन कार्ड व ओळखपत्र तयार करुन फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. त्याच्यावर यापूर्वी सिंहगड पोलीस ठाणे (Sinhagad Raod Police Station), वाकड (Wakad Police Station) तसेच नगर येथे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,
सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार विजय गुरव,
प्रदिप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे,
अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, शंतर संपत्ते,
पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे आणि आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Man Impersonates Army Officer To Impress Women,
Cheat Shopkeepers; Arrested On Information From Military Intelligence

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा