Kolhapur Police Raid On Gambling Den | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडताच 2 तरूणांची थेट इमारतीवरून उडी; एकाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Police Raid On Gambling Den | जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (Kolhapur Police) छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन युवकांनी इमारतीवरुन उडी मारली आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू (Death) झाला तर दुसरा तरुण जखमी (Injured) झाला आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur News) घडली आहे. साहिल मिनेकर (Sahil Minekar) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे (Dattatraya Devkule) हा युवक जखमी आहे. (Kolhapur Police Raid On Gambling Den)

 

याबाबत माहिती अशी की, कोल्हापुरातील राजेंद्रनगर (Rajendra Nagar Kolhapur) परिसरातील एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी (Kolhapur Police) रात्री अकराच्या सुमारास तिथे छापा (Raid) टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. पोलीस पकडतील या भीतीने साहिल आणि दत्तात्रय या दोन युवकांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. मात्र दगडावर डोके आपटल्याने साहिल मिनेकरचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे जखमी झाला.

दरम्यान, पोलिसांनी साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात (Kolhapur Government Hospital) पाठवला असून
दत्तात्रयला उपचारासाठी खासगी रुग्णालयात (Private hospital) दाखल करण्यात आले आहे.
साहिल एका खासगी फायनान्स कंपनीत (Finance Company) काम होता.
त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले, असा परिवार असल्याची माहिती आहे.

 

Web Title :  Kolhapur Police Raid On Gambling Den | 2 youths jump directly from building as
police raid gambling den; One died on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा