Sadabhau Khot | “देशी दारूच्या क्वॉर्टरएवढी किंमत तरी 1 लिटर दुधाला द्या” – सदाभाऊ खोत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sadabhau Khot | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडे (Shinde-Fadnavis Government) एक मागणी केली आहे. देशी दारूच्या एका बाटलीची जेवढी किंमत आहे, तेवढे पैसे आम्हाला नकोत. पण देशी दारूच्या एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढी किंमत 1 लिटर दुधाला (1 Liter Of Milk) द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DY CM Devendra Fadnavis) यांना इशारा देखील दिला आहे. (Pune News)

 

इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा (Farmers Meeting) झाला. यावेळी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही मागणी करत राज्यातील सरकारला इशारा दिला. दि. 22 मे 2023 रोजी पुण्यामध्ये (Pune) दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने (Ryat Kranti Organization) यात्रा काढली होती. त्याची दखल घेऊन दुग्धविकास मंत्रालयाने (Ministry of Dairy Development) बैठक लावली आहे. या बैठकीत आम्ही दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहोत, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

 

“गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये दर मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला 125 रुपये प्रति लिटरला दर मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणे अवघड नाही. त्यामुळे महागाई (inflation) वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला (Farmer) जर दर दिला तर महागाई निश्चित मनाने कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसे शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो,” असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, “जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल.
सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावे. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे.
त्या शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारले तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये,”
असा इशाराच सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

 

 

Web Title :  Sadabhau Khot | sadabhau khot demand pay same amount of money
for a liter of milk as the price of country liquor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा