Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | शहर पोलिस दलातील (Pune City Police) गुन्हे शाखेच्या युनिट- 2 च्या पथकाने कात्रजगाव परिसरातून एका आरोपीला अटक केले आहे. त्याच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये (Bharti Vidyapeeth Police Station) खुनाच्या प्रयत्नाचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यानंतर 12 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आलेले आहे. (Pune Police Crime Branch News)

 

पोपट नामदेव माळवे Popat Namdev Malve (42, रा. कात्रज भैरवनाथ मंदिर शेजारी, कात्रजगाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) आणि पोलिस हवालदार नामदेव रेणुसे (Police Namdev Renuse) यांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. (Pune Police Crime Brnach News)

 

प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कात्रजगाव परिसरात सापळा रचुन आरोपीला अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Sr PI Krantikumar Patil), पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार नामदेव रेणुसे, शंकर नेवसे, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, समीर पटेल, मोहसिन शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे आणि नागनाथ राख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Police Crime Branch News | Popat Namdev Malve Arrested In Attempt To Murder
Of Bharti Vidyapeeth Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा