Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याहून अलिबागला जाणार्‍या खासगी बसला ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) भीषण अपघात (Pune Pimpri Accident News) झाला असून त्यात २ महिलांचा मृत्यु (Death) झाला आहे. बसमधील ५५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात (Pune Pimpri Accident News) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

पुण्याहून एम एच ०४ एफ के ६२९९ ही बस माणगावकडे जात होती. ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व ती घाटात रस्त्यावरुन खाली जाऊन उलटली. त्यात बस ही पुर्णपणे उलटी झाली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघाताची (Pune Pimpri Accident News) माहिती मिळताच माणगाव पोलीस (Mangaon Police) तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी प्रवाशांना मिळेल त्या वाहनांतून माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमीवर उपचार करण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेकडून आंबेगाव बु. येथील अनधिकृत 11 इमारतींवर हातोडा

Pune Municipal Corporation (PMC) | थकीत पाणी बिलावर मनपा आकारणार दंडात्मक व्याज, मीटर बिल भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत

हिंजवडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत राडा, सदस्यासह 8 जणांवर FIR

अश्लील बोलून महिलेसोबत गैरवर्तन, दोन ऍम्ब्युलन्स चालकांवर FIR; आळंदी मधील प्रकार

लिफ्ट मागणे बेतले जीवावर, भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; निघोजे येथील घटना

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक