पोलिसांच्या ‘सेवा अ‍ॅप’ला १ लाख जणांनी दिला ‘प्रतिसाद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या ‘सेवा अ‍ॅप’ला चांगला प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दहा महिन्यात १ लाख ९ हजार अभ्यागतांनी विविध पोलीस ठाण्यातंर्गत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी १ लाख ५ हजार १७० जणांना सेवा कार्यप्रणालीकडून संपर्क करण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांचे समाधान झाले की नाही तपासणीसाठी ६२ हजार फोन कॉल्स करण्यात आले. तर उर्वरित फोन विविध महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा दला’त कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागरिकांच्या तक्रारीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी संबंधित पोलीस चौक्यांसह ठाण्यातून मदत झाली की नाही तपासणीसाठी सेवा अ‍ॅपच्या माध्यमातून फोन करुन संबंधितांची प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. त्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना अर्जदारांच्या तक्रारबद्दल थेट पोलीस आयुक्तालयातून विचारणा केली जात आहे. त्यामुळे अर्जदारांच्या कामकाजाला गती मिळाली आहे.

दरम्यान, असमाधानी अर्जदारांना फोन करुन त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यात येत असल्यामुळे तक्रारींचे निवारण होण्यास मदत होत आहे. विविध तक्रारींनुसार नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामध्ये कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायालय, महानगरपालिका तक्रार, महसूल, बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या तक्रारींबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त