Pune Police | बदनामीच्या हेतूने IPS अधिकार्‍यावर आरोप करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नावाने लिहिली पत्रे, गुन्हा दाखल

पुणे : Pune Police | अप्पर पोलीस आयुक्तांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करणाऱ्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या नावाने वरिष्ठांना पत्र लिहून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात (Pune Police) एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर पोलीस आयुक्तांना त्रास देण्याच्या हेतूने कोणीतरी पोलीस आयुक्त व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना पत्र लिहिली होती. त्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक व एका महिला पोलीस उपनिरीक्षकांच्या नावे अशी एकूण ५ वेगवेगळी पत्रे पाठविण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही पत्र पाठविण्यात आली होती. अप्पर पोलीस आयुक्तांकडून आम्हाला त्रास दिला जात असल्याचे त्यात म्हटले होते. ही पत्र मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी या पत्राखाली सह्या असणार्‍या या पोलीस अधिकार्‍यांकडे पोलीस आयुक्तांनी चौकशी केली. त्यात संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी आम्ही ही पत्र लिहिली नसल्याचे सांगून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी केल्यानंतर त्यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या नावाचा गैरवापर करुन अप्पर पोलीस आयुक्तांची बदनामी व्हावी व बदली व्हावी, या हेतूने ही पत्र लिहिली असल्याचे आढळून आले. त्यानंतर आता कट करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police)

या अप्पर पोलीस आयुक्तांकडे अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या गैरवर्तनाबाबतची चौकशी सोपविण्यात
आली होती. त्यात काही दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस त्यांनी केली होती.
त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title :-Pune Police | Letters written in the name of police inspectors, assistant inspectors, sub-inspectors accusing IPS officers for defamation, case registered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sarla Ek Koti | सरला एक कोटीमध्ये ईशा केसकर मुख्य भूमिकेत!

Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

Kiff 2022 | अमिताभ बच्चन यांच्या बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले ‘हे’ मोठे विधान