Pune Police MCOCA Action | कोंढवा परिसरात ‘भाईगिरी’ करणाऱ्या गणेश कोरडे याच्यासह इतर 2 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 60 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पानटपरी चालकाला धारदार हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या कोंढवा (Kondhwa Police Station) येथील गणेश गौतम कोरडे याच्यासह इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 60 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

हांडेवाडी रोडवरील पानटपरी चालकाला हत्याराचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने टपरी चलकाला बेदम मारहाण करुन गल्ल्यातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पैसे घेऊन पळून जाताना टपरी चालकाने आरडाओरडा केल्याने त्याठिकणच्या नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्यांचा एक साथीदार पळून गेला. हा प्रकार 3 ऑगस्ट रोजी हांडेवाडी रोडवरील इफ्रा पान शॉप येथे घडला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर आयपीसी 386, 504, 506 (2), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टपरी चालकाने फिर्याद दिली आहे. (Pune Police MCOCA Action)

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख गणेश गौतम कोरडे (वय-22 रा. कुंजीरवाडी, शितोळे वस्ती मागे, हडपसर), अमर विठ्ठल देशमाने (वय-23 रा. शेवाळे कॉम्प्लेक्स, हांडेवाडी) यांना अटक केली. तर साहिल अर्जुन कचरावत (वय-21 रा. कंजारभाट वस्ती, पुणे) हा फऱार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टोळी प्रमुख गणेश कोरडे याने गुन्हेगारी टोळी तयार करुन स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच टोळीच्या वर्चस्वासाठी एकट्याने व सदस्यांच्या मदतीने गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींनी गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, शस्त्राने गंभीर जखमी करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, नागरिकांना मारहाण करुन जखम करणे तसेच शस्त्राचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण करण्यासारखे गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे
कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांनी परिमंडळ-5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले,
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस अंमलदार जगदीश पाटील,
राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर यांनी केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व
मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का,
तडीपार यासारख्या कारवाया केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 60 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ! दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ

गणपती वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड; लोणी स्टेशन येथील चौघांवर गुन्हा दाखल (Video)

कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम

Smriti Irani | निराधार मुलांच्या संगोपनासाठी ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार;
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याची करोडोची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक