Pune Police | महिलेची रिक्षात विसरली पैसे अन् दागिन्यांची बॅग, सहकारनगर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन केली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेची रिक्षात विसरलेली बॅग सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नामुळे काही तासात परत मिळाली. विसरलेली बॅग परत मिळाल्याने महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यातील (Sahakarnagar Police Station) बीट मार्शल पोलिसांचे (Beat Marshall Police) आभार मानले. या बॅगेमध्ये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने होते. (Pune Police)

सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला रडतरडत धनकवडी पोलीस चौकी आली. तिने सांगितले की मोहननगर आंब्याचे झाड ते धनकवडी लास्ट बस स्टॉप असा रिक्षातून प्रवास केला असताना बॅग रिक्षातच राहिली. या बॅगेमध्ये पाच हजार रुपये व दीड तोळ्याचा गंठण आहे. (Pune Police)

धनकवडी बीट मार्शल पोलीस हवालदार जोशी, पोलीस शिपाई येनपुरे, घाडगे यांनी लक्ष्मी ज्वेलर्स तसेच
पोलीस स्टेशन येथे येऊन धनकवडी शेवटचा बस स्टॉप येथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून
रिक्षाचा फोटो आणि रिक्षाचा क्रमांक काढून रिक्षाचालकाचा शोध घेतला. पोलिसांनी रिक्षा चालकास धनकवडी चौकीत बोलावून
महिलेची बॅग तसेच रोख रक्कम व सोन्याचा गंठण महिलेच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
महिलेने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक, प्रचंड खळबळ

फटाके फोडण्यावरुन जातिवाचक शिवीगाळ, एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; डेक्कन परिसरातील प्रकार

तोडफोड करुन तीन वाहने पेटवली, वारजे परिरातील घटना