Pune Police MPDA Action | हडपसर परिसरात अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 48 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गंभीर गुन्हे करुन हडपसर परिसरात दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार विनोद बंदिछोडे याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 48 वी कारवाई आहे. (Pune Police MPDA Action)

विनोद तुळजाराम बंदिछोडे Vinod Tuljaram Bandichode (वय-26 रा. वैभव टॉकीज मागे, कामठेवस्ती, हडपसर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत चाकु, कोयता यासारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, शस्त्राने गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

विनोद बंदिछोडे याच्या विरोधात मागील पाच वर्षात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी विनोद बंदिछोडे याला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke)
व पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Sr PI AT Khobre) यांनी केली.
पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 48 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी मंगळवारी दोन तासांसाठी बंद