Pune Police MPDA Action | लोणीकंद परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 34 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | लोणीकंद पोलिस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे (Pune Crime News) करणाऱ्या अट्टल गन्हेगाराविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 34 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

गुरुनाथ उर्फ महेश जालींदर कांबळे Gurunath alias Mahesh Jalinder Kamble (वय-32 रा. एस.टी. कॉलनी वाघोली, ता. हवेली जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह गावठी दारु तयार (Hand Kiln Liquor) करणे, विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी महेश कांबळे याच्या विरोधात मागील पाच वर्षात 8 गुन्हे लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी महेश कांबळे याला
नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior PI Gajanan Pawar)
व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे (Senior PI Vishwajit Kaigande) व पथकाने केली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 34 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhima Patas Sugar Factory Corruption Case | 500 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी क्लिनचीट मिळाल्यावर राहुल कुल यांची प्रतिक्रिया, म्हणाले…