Pune Police MPDA Action | सहकारनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 72 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दंगा यासारखे गंभीर गुन्हे करुन सहकारनगर परिसरात दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार विनायक तानाजी गायकवाड (वय-22 रा. तळजाईमाता वसाहत, पद्मावती, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 72 वी कारवाई आहे.

आरोपीने त्याच्या साथीदारांसह सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत पिस्टल, कोयता, तलवार या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे (Pune Crime News) केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती.

विनायक गायकवाड याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी विनायक गायकवाड याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr. PI Surendra Malale),
गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे (Crime Branch P.C.B.)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्तांनी आतापर्य़ंत 72 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार
असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka,
तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवण देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकावर धारदार हत्याराने वार,
दोघांना अटक; सदाशिव पेठेतील घटना

जुन्या भांडणातून महिलेला अश्लील शिवीगाळ, पतीला जीवे मारण्याची धमकी; कोथरुड परिसरातील प्रकार