Pune Police MPID Action | गुंतवणूकदारांची 74 कोटींची फसवणूक ! सोहम इम्पेस प्रा. लि. च्या दशरथ मच्छिंद्र कोकरे, वर्षा दशरथ कोकरे, महेश रामभाऊ बंडगर, सागर रामभाऊ बंडगर यांच्यावर एम.पी.आय.डी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPID Action | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर 45 ते 60 दिवसांत कमीत कमी 50 ते 60 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोहम इम्पेस प्रा. लि. कंपनीच्या (Soham Impace Pvt. Ltd. Company) चार जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गुंतवणूकदारांची तब्बल 74 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये एम.पी.आय.डी गुन्ह्याचा (Pune Police MPID Action) अंतर्भाव करण्यात आला आहे. (Maharashtra Protection of Interest of Depositors (MPID)

सोहम इम्पेस प्रा. लि.चे दशरथ मच्छिंद्र कोकरे Dashrath Machindra Kokare (वय-39), वर्षा दशरथ कोकरे Varsha Dashrath Kokre (दोघे रा. सेक्टर 6, खारघर, नवी मुंबई), महेश रामभाऊ बंडगर (Mahesh Rambhau Bandgar), सागर रामभाऊ बंडगर Sagar Rambhau Bandgar (दोघे रा. स्वप्नपूर्ती बिल्डींग सोसायटी, सेक्टर नं. 36 खारघर, नवी मुंबई) यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात आयपीसी 420, 406, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कलम 3 व 4 चा अंतर्भाव करण्यात आला आहे. याबाबत मनोज सुरेश लुंकड (वय-47 रा. हाईट पार्क सोसायटी, मार्केट यार्ड, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 ते 2018 दरम्यान घडला आहे.

आरोपी दशरथ कोकरे व इतर आरोपींनी संगनमत करुन सोहम इम्पेस नावाच्या फर्ममध्ये पैसे गुंतवणूक केल्यास 45 ते 60 दिवसांत कमीत कमी 50 ते 60 टक्के परतावा देतो असे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी दोन बनावट ईमेल दाखवले. त्यापैकी एक इमेल केंद्र शासनाच्या Ministry of Finance नवी दिल्ली आणि आरोग्य विभागाने सोहम इम्पेस कंपनीच्या मेल आयडीवर आल्याचे दाखवले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 66 कोटी 33 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर फिर्यादी यांना कोणताही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज लुंकड यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. (Pune Police MPID Action)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले.
यामध्ये जीवन पांडुरंग चव्हाण (वय-45 रा. मांजरी खुर्द) यांची 45 लाख, विजय हरकचंद नवलखा (वय-52 रा. पुणे-सातारा रोड, पुणे)
यांची 5 कोटी 14 लाख, मणि श्रीदर मलामुल्लय (वय-54 रा. चेंबूर) यांची 75 लाख आणि
अनिल चंद्रभान बन्साळी (वय-62 रा. मार्केटयार्ड, पुणे) यांची 1 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
आरोपींनी गुंतवणूकदार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणूकदारांना गुणंतवणूक
केलेल्या रक्कमेचा धनादेश दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींनी 74 कोटी 2 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले असून
आणखी लोकांची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

दरम्यान आरोपींना 6 सप्टेंबर 2023 रोजी न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
तपासामध्ये आरोपींनी अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना अटक करुन
अधिक तपास करायचा आहे. तसेच आरोपींना आलेले ईमेल कोठुन व कोणाच्या मदतीने तयार केले आहेत
याचाही तपास करायचा असल्याने आरोपींचा अटकपुर्व जामीन मंजरू करु नये असा अर्ज
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) यांनी
सरकारी अभियोक्ता यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Contract Tehsildar Recruitment Advertisement | कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात अखेर रद्द, महसूलमंत्र्यांचा मोठा खुलासा