Pune Police | हॉटेल प्यासा येथे तरुणावर सत्तुराने वार, फरार झालेल्या 4 आरोपींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police |  घरगुती वादातून (Domestic Dispute) एका तरुणाला आंबेगाव बु. येथील हॉटेल प्यासा (Hotel Pyasa) येथे बोलावून घेत त्याच्यावर सत्तुराने वार केल्याची घटना गुरुवारी (दि.2) घडली होती. आरोपींनी जखमी तरुणाचा मोबाईल आणि सोन्याची चैन (Gold Chain) काढून घेवून पळून गेले होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station)  IPC 307, 327, 323, 143, 147, 149, 504, 506, आर्म अॅक्ट (Arm Act) कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी (Pune Police) धायरीगाव येथे सापळा रचून अटक (Arrest) केली. (Pune Crime)

 

याबाबत सिद्धार्थ मदन काटकर Siddharth Madan Katkar (वय-20 रा. धनकवडी, पुणे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबू ओव्हाळ उर्फ भावड्या Ganesh Babu Oval alias Bhavadya (वय-23 रा. आंबेगाव बु.), अक्षय सुनिल येवले उर्फ सोन्या Akshay Sunil Yeole alias Sonya (वय-28 रा. कृष्णकुंज बिल्डींग, आंबेगाव), राहूल नागेश माने Rahul Nagesh Mane (वय-24 रा. शुक्रवार पेठ, पुणे), शुभम नथु भोरेकर Shubham Nathu Bhorekar (वय-23 रा. गायमुख चौक, आंबेगाव बु.) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Police)

आरोपींनी घरगुती वादातून सिद्धार्थ काटकर याला प्यासा हॉटेल येथे बोलावून घेतले. याठिकाणी आरोपी आणि फिर्यादी यांच्यात शाब्दीक वाद झाले. यानंतर आरोपी राहुल माने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या (Attempt to Kill) उद्देशाने लोखंडी सत्तुराने सपासप वार केले. तसेच फिर्यादी यांचा मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चैन घेऊन पळून गेले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) व अवधुत जमदाडे (Avadhut Jamdade) यांना आरोपी धायरीगावात (Dhayarigaon) येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav), पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Police Vijay Puranik)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
आशिष कवठेकर (API Ashish Kavthekar), पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde), धिरज गुप्ता,
पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, अवधुत जमदाडे, राहूल तांबे,
धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, नवनाथ खताळ, विक्रम सावंत व तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Police | murder attack on youth at Hotel Pyasa, bharti vidyapeeth police arrest four

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा