Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला ड्रग्ज केसमधून मिळाल दिलासा; एनसीबीचा जामिनावर आक्षेप नाही

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणातून सुशांत सिंग रजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला दिलासा मिळाला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर (Sushant Singh Rajput suicide) एनसीबीने रिया चक्रवर्तीला अमली पदार्थाच्या केसमध्ये (Rhea Chakraborty Drug Case) आरोपी मानले होते. मात्र त्यानंतर रियाला मुंबई हायकोर्टाकडून (Bombay High Court) जामानी मिळाला होता. आता एनसीबी (NCB) तर्फे मंगळवारी रिया चक्रवर्तीच्या जामीनावर कोणताही आक्षेप त्य़ांच्याकडून घेतला जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही आमली पदार्थाच्या केसमध्ये अडकली होती. यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाला सांगितले की, एनसीबी जामिनाला आव्हान देत नाही, परंतु एनडीपीएस कायद्याच्या कलम 27-ए संदर्भात कायद्याचा प्रश्न खुला ठेवण्याची गरज आहे. असे सांगितले.

रिया चक्रवर्ती हिला जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध एनसीबीच्या याचिकेवर सुनावणी करत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने, अभिनेत्रीला जामीन देण्याबाबत एनसीबीच्या भूमिकेत बदल करण्याबाबत एएसजीच्या सादरीकरणाची दखल घेतली. परंतु हे देखील स्पष्ट केले की, सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला जामीन देण्याच्या निर्णय उच्च न्यायालयाला इतर कोणत्याही बाबतीत उदाहरण म्हणून घेतले जाणार नाही.

खंडपीठाकडून असे सांगण्यात आले आहे की, “एएसजीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, या टप्प्यावर, जामीन मंजूर करण्याच्या चुकीच्या आदेशाला आव्हान देण्याची गरज नाही,” NCB ने NDPS कायद्याच्या कलम 27-A अंतर्गत रियावर आरोप लावले आहेत जे ‘अवैध अमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठा करण्यास मदत करणे आणि प्रोत्साहन देणे’ याच्याशी संबंधित आहे. यामध्ये 10 वर्षांपर्यंत कारावास आणि जामिनावर बंदी घालण्याची तरतूद आहे.

उच्च न्यायालयाने म्हटले होते की, अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी पैसे देणे म्हणजे अंमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठा करणे नाही. त्यात म्हटले होते की, “म्हणून, अर्जदारावर सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे खर्च केल्याचा आरोप म्हणजे त्याने अवैध तस्करीसाठी पैसे दिले असा होत नाही.”

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही या अमली पदार्थाच्या केसमुळे खूप ट्रोल (Rhea Chakraborty Trolling) झाली आहे.
रियाला सोशल मीडियावर देखील खूप सुनावण्यात आले. मात्र यामधून आता रिया बाहेर येत असून पुन्हा काम करायला लागली आहे.
अनेक दिवसांनंतर तिचे पुनरागमन झाले आहे. एमटीव्हीच्या रोडीज शोमध्ये ती जजच्या भूमिकेमध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty in MTV Roadies) दिसत आहे.

Web Title : Rhea Chakraborty | sushant singh rajput case rhea chakraborty not challenging bail granted in drug related case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)