Pune Police News | उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा !आयर्नमॅन विजेत्यांकडून पोलिसांना धडे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Police News | पोलिसांचे आरोग्य सदृढ असेल तर समाजाचे आरोग्य देखील सदृढ राहील. प्रत्येकाने स्वत:साठी एक तास काढून व्यायाम करुन आरोग्य सदृढ राखावे, असा मंत्र आयर्नमॅन डॉ. कौस्तुभ राडकर (Ironman Dr. Kaustubh Radkar) यांनी पोलिसांना (Pune Police News) दिला.

गणेशोत्सवाचा बंदोबस्त सुरु असताना त्यांच्यात कामासाठी उत्साह यावा, यासाठी समर्थ पोलिसांच्या (Samarth Police) वतीने आयर्नमॅन विजेत्यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते.

डॉ. कौस्तुभ राडकर (Ironman Dr. Kaustubh Radkar), दशरथ जाधव, डॉ. राहुल झांजुर्णे, हेमंत परमार या आयर्नमॅन विजेत्यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे (dcp dr priyanka narnaware), समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (senior police inspector vishnu tamhane), पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम (police inspector ulhas kadam) यांनी त्यांचे स्वागत केले.

Mumbai News | भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून 16 वर्षाच्या मुलीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

यादरम्यान डॉ. राडकर यांनी सांगितले की, आयर्नमॅन स्पर्धेत सायकलींग, स्वीमिंग व रनिंग हे प्रकार एकाच वेळेस दिलेल्या १६ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते.
प्रत्येकाने व्यायामासाठी एक तास स्वत:ला देणे आवश्यक आहे.

उद्योजक दशहर जाधव यांनी सांगितले की, वयाच्या ५६ व्या वर्षी व्यायामाला सुरुवात केली.
उद्योगाचा सर्व व्याप सांभाळून आयर्नमॅनची तयारी केली होती.
त्यामुळे आज ६४ व्या वर्षीही आरोग्य उत्तम आहे.

हेमंत परमार म्हणाले की, तीन वर्षापूर्वी आपले वजन १०६ किलो होते. सध्या ६६ किलो आहे.
उत्तम आरोग्याचे रहस्य व्यायाम हे आहे.

डॉ.झांजुर्णे म्हणाले, की कारणेरिया आजारावर (कोणतेही नवीन काम न करण्याच्या सबबी) मात करुन प्रत्येकास नवीन आव्हानासाठी तयार करण्याची उर्जा, चैतन्य हे व्यायामातून मिळत असते.

यावेळी समर्थ पोलीस ठाण्यामधील उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार रणजित उबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, हेमंत पेरण, शुभम देसाई, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुमीत खुट्टे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, धिरज शिंदे, वनिता माेरे यांचा तसेच कोरोना काळात मदत करणाऱ्या २० पोलीस मित्रांचा सन्मान करण्यात आला.

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! 70 वर्षाच्या नराधमाची 30 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी, कोंढव्यातील घटना

Maharashtra Dam Water Level | कोयना, भंडारदरा ‘ओव्हर फ्लो’ तर पुण्यातील तीन धरणं 100 % भरली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Police News | Exercise is important for good health! Lessons from Ironman winners to the police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update