Pune Police News | वारजे माळवाडी पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या लॅपटॉप चोरीचे 12 गुन्हे उघडकीस ! पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लॅपटॉप केले परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | कॉलेज परिसरातील बिल्डिंग, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे चार्जिंग लावलेले लॅपटॉप चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे 13 लॅपटॉप, 7 लॅपटॉप चार्जर, 1 सोनी कंपनीचा कॅमेरा, 2 दुचाकी असा एकूण 6 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 12 गुन्हे उघडकीस आले. अर्जुन तुकाराम झाडे (वय-22) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे (Pune Police News). दरम्यान, आज पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar)आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लॅपटॉप परत करण्यात आले आहेत. (Pune Police News)

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पोलीस ठाण्यात दाखल असलेले आणखी दोन लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी प्रतिक मांडेकर व ऋषिकेश शिर्के (दोघे रा. मवाळे आळी, कर्वेनगर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. (Pune Police News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी लॅपटॉप केले परत

वारजे माळवाडी पोलिसांनी विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणाऱ्यांना अटक
करुन त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप जप्त केले आहेत.
जप्त केलेले लॅपटॉप पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सोमवारी (दि.6) फिर्यादी यांना परत
करण्यात आले आहे. या कामगिरीबाबत पोलीस आयुक्तांना वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी
व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहेत. यावेळी पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे हादरले! घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

हडपसर पोलीस स्टेशन समोर जुन्या गाडीत आढळला मृतदेह, प्रचंड खळबळ