शहरात पोलिसांची गस्त, जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचं आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचं आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वाधिक महत्वा भाग हा एकमेकांपासून दूर रहाणे आणि गर्दी टाळणे हाच उपाय असल्याचे आहे. जगभरात अनुभवावरून हे लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी रविवारीचा जनता कर्फ्यु 100 टक्के प्रतिसाद देऊन यशस्वी करावा असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

अडचणीमुळे कोणी घराबाहेर पडत असेल तर त्याला कोणताही त्रास देऊ नये, अथवा कायदा हातात घेऊ नये, असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले आहे.

चीन, दक्षिण कोरिया, फान्स,अमेरिका या देशात कोरोना आजार रोखण्यास एकमेकांपासून अंतर राखणे हाच सध्या तरी उपाय असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने शासनाने उपाय योजना करत आहे. लोकांनी आपल्या घरातच रहावे, घराबाहेर पडु नये व कोरोना विषाणूच्या फैलावास सहाय्य होईल, अशी कोणतीही कृती करु नये, हीच त्यामागची भूमिका आहे़.

रविवारचा दिवस घरीच घालवावा. बाहेर पडू नये, पोलिस दिवसभर गस्त राहणार आहे. महत्वाच्या चौकात पोलीस कर्मचारी असणार आहेत. ज्यांना अडचण असेल, त्यांना पोलीस मार्गदर्शन करतील़ कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी १०० क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस आयुक्त डॉ. के़ व्यंकटेशम यांनी सांगितले.

येरवडा भागात काही जण कंपन्यांमध्ये जाऊन कंपनी बंद करण्याविषयी दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, काही कंपन्यांकडे बँकांचे सर्व्हरचे
काम असते, इतरही महत्वाच्या बाबी असतात. त्यांना अचानक कंपनी बंद करता येत नाही. त्यांना टप्प्या टप्याने कर्मचारी कमी करण्यास सांगितले आहे. कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, हा कोरोना विषाणूशी सर्वांना एकत्रितपणे लढा आहे. एकमेकांपासून अंतर राखल्यानेच आपण त्याचा प्रसार रोखू शकतो, हे लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.