पालखी सोहळ्यात अडथळा आणणाऱ्या संघटनांवर कारवाई करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोणतीही संघटना पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. त्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. असा इशारा विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिला आहे. तर दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी कोणत्याही संघटनेला पालखी सोहळ्यात येण्यास मज्जाव करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती. दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर पोलीस काय कारवाई करतील हे लवकरच समजेल.

मागील वर्षी संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानच्या धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या शंभरपेक्षा अधिक धारकरींना स्थानबद्ध केले होते. मात्र, संभाजी भिडे यांनी पालखीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी परंपरा मोडल्याचे मत व्यक्त करत पालखी प्रमुख आणि वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत दोन्ही पालखी प्रमुखांसह, मानकरी, विश्वस्थांची बैठक घेतली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्य़कर्ते पालखी सोहळ्यात शक्ती प्रदर्शन करताता. त्यामुळे पालखी सोहळ्याला आडथळा निर्माण होतो. परिणामी पालख्यांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळे पोलिसांनी योग्य दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत पोलिसांनी संभाव्य प्रकार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी वेगळा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे