Pune Police | पुणे पोलिसांचा ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ पुरस्कार देऊन गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने (Maharashtra Police) देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ (The Best Police component) पुरस्कार (Award) पुणे पोलिसांना (Pune Police) प्राप्त झाला आहे.
पुणे पोलिसांच्या (Pune Police) वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला.
हा पुरस्कार 2020 या वर्षासाठी देण्यात आला आहे.

 

पोलीस महासंचालक कार्यालयाच्या (DGP Office) वतीने प्रत्येक वर्षी पोलीस दलाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य पातळीवरील (State Level) विविध घटकांनुसार पुरस्कार दिले जातात.
त्यानुसार 2020 या वर्षासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ हा पुरस्कार पुणे पोलीस दलाला (Pune Police) मिळाला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत (Mumbai) नुकतीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परिषद (Council of Senior Police Officers) पार पडली.

 

या परिषदेमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ हा पुरस्कार,
प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ (DGP Rajneesh Sheth), मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey),
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये (Additional Chief Secretary, Home Department Anand Limaye)
यांच्यासह राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे 2020 या वर्षासाठी 7 हजार पेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्या घटकांमध्ये गुन्हे उघडकीस आणणे,
निर्गती, दोषसिद्धी, प्रशासन, अस्थापना, जनसंपर्क यासारख्या विविध प्रकारचे निकष पुणे शहर पोलीस घटकाने पूर्ण केले.
यामुळे पुणे शहर पोलिसांना सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ म्हणून गौरवण्यात आले.

 

यावेळी बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, पुणे शहर पोलीस घटकातील सर्व संवर्गातील अधिकारी व अंमलदार यांनी नियमीत केलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांना यश मिळाले.
भविष्यकाळातही पुणे पोलीस दल (Pune Police Force) अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करुन पोलीस दलाची प्रतिमा उज्वल करेल.

 

पुरस्कार स्विकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले,
पुणे शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी,
अंमलदार यांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे हे फळ त्यांना मिळाले आहे.
हा पुरस्कार मिळाल्याने पोलिसांना अधिक चांगले काम करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच बळ मिळेल.

 

Web Title :- Pune Police | with best police component award state home minister dilip walse patil
police commissioner IPS amitabh gupta accepted award

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा