Pune Rain | 2 दिवसांच्या पावसांतच शहरातील वाहतूक कोलमडली; वाहतूक पोलिस आणि पालिकेमध्ये समन्वयचा अभाव, फटका मात्र पुणेकरांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rain | जून मध्ये ओढ दिल्यानंतर मागील दोन दिवसांपासून शहरात संततधार सुरू झाली आहे. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने तसेच वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे जवळपास संपुर्ण शहरातील वाहतूक ठप्प (Traffic Jam In Pune) झाली होती. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसोबतच चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. तर प्रशासकिय कामकाजाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Pune Rain)

 

शहरात मागील दीड ते दोन वर्षांमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा, ड्रेनेजलाईन तसेच खोदाईच्या अनेक कामांमुळे बहुतांश रस्त्यांना केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे. सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते वगळता शहरातील एकही रस्ता समतल नसल्यामुळे अनेकठिकाणी पावसात खड्डे पडले असून काही ठिकाणी वरचेवर अंथरलेल्या डांबरातील खडी इतस्तत: पसरली आहे. अशातच काल रात्रीपासून शहरातील विविध भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सिग्नल यंत्रणाही बंद पडली होती. त्यामुळे सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क, येरवडा, पुणे विद्यापीठ चौक, स्वारगेट, दांडेकर पूल चौक या परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होउन त्याचे पर्यवसन वाहतूक कोंडीमध्ये झाले होते. (Pune Rain)

 

सकाळी साडेदहा ते एक आणि संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळा भरायच्या आणि सुटायच्यावेळी मध्यवर्ती भागातील शाळांमध्ये स्कूल व्हॅन व अन्य वाहनांमुळे कोंडीत अधिकच भर पडली होती. तसेच संध्याकाळी शाळा आणि कार्यालयीन सुटीच्यावेळीही मोठ्याप्रमाणावर वाहने विशेषत: मोटारी रस्त्यावर आल्याने सर्वच रस्त्यांवर लांबच लांब रांगा दिसत होत्या. परंतू अशा निर्णायकी प्रसंगी गर्दीच्या ठिकाणी एखादा दुसरा पोलिस कर्मचारी तुंबलेली वाहतूक गतीमान करण्याचा प्रयत्न करत होता. पावसाळ्यातील वाहतुकीचे कुठलेच नियोजन आतापर्यंत तरी पोलिसांकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळालेले नाही.

पोलिसांचा वचकच न राहील्याने अरूंद रस्त्यांवर आणि नो पार्किंगमध्ये सर्रास वाहने उभी केली जात आहेत.
याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) मागील दोन आठवड्यांपासून रस्त्यावरील दंडात्मक कारवाई बंद केल्याने पोलिसही दिसणे दुर्मिळ झाले आहे.
याचा परिणाम म्हणून की काय बेशिस्त वाहनचालकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. याचाही फटका वाहतुकीला बसत आहे.

 

मंगळवारपासूनच शहरातील वाहतूक कोंडी अधिक वाढू लागली आहे.
मंगळवारी पुणे महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar)
यांना संगमवाडी ते येरवडा हे अवघे दोन ते अडीच कि. मी. चे अंतर जाण्यासाठी ४० मिनिटे उशिर झाला.
तसेच महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांनाही या कोंडीचा फटका बसल्याची चर्चा महापालिका (Pune Municipal Corporation) वर्तुळात होती.

 

Web Title :- Pune Rain | Within 2 days of rain traffic in the city collapsed Lack of coordination between traffic police and municipality however hit Punekar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा