Pune Ready Reckoner Rate | पुण्यात घरांचे स्वप्न आणखी महागणार! रेडी रेकनरचे दर वाढविण्याचा प्रस्ताव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ready Reckoner Rate | पुण्यात घर घेणं महागणार (Pune Home Price) आहे. येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर वाढवण्याचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने (Registration and Stamp Duty Department) प्रस्तावित केली आहे. त्यामुळे पुण्यात घर घेणं सर्वसामान्यांचे स्वप्न आणखी महागणार आहे. पुण्यात घरांच्या किंमती वाढल्या असताना शासनाच्या या निर्णयामुळे (Pune Ready Reckoner Rate) या किंमतीत पुन्हा वाढणार आहेत.

रेडी रेकनच्या दरात वाढ (Pune Ready Reckoner Rate) करण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिला आहे. यामध्ये पुण्यात 8 ते 15 टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात (PCMC) 10 ते 15 टक्के तर ग्रामीण (Pune Rural) भागात 5 ते 7 टक्के दर वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. रेडी रेकनर दर 1 एप्रिल 2023 रोजी सुधारित केले जातात. यामुळे पुणे शहर आणि परिसरातील घरांच्या किंमती पुन्हा वाढणार आहेत.

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.
शासनाने याला अद्याप मंजुरी दिलेली नाही.
परंतु हा प्रस्ताव मान्य झाल्यास पुण्यातील घरांच्या किमती वाढणार आहेत.
हे दर निश्चित करताना विभागाने गेल्या 11 महिन्यांच्या मालमत्तांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे.
पुण्यात 2018-19 आणि 2019-20 मध्ये रेडी रेकनरचे दर हे स्थिर होते. त्यानंतर 2020-21 मध्ये
यामध्ये 1.25 टक्के तर 2021-22 या वर्षात 5 टक्के आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 9.2 टक्के दर
वाढ झाली होती. परंतु, आता तब्बल 15 टक्के दरवाढ प्रस्तावीत करण्यात आली आहे.
जर ही दरवाढ लागू झाली तर आजपर्यंची ही सर्वात मोठी दरवाढ असेल.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आगामी काही वर्षात मोठे प्रकल्प येत आहेत.
यामध्ये पुरंदर मध्ये विमानतळ (Airport), रिंग रोड (Ring Road), मेट्रो (Pune Metro), रेल्वे मार्ग,
एमआयडीसी (MIDC), महामार्गाचे रुंदीकरण हे मोठे प्रकल्प प्रस्तावीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील
जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत. याचा देखील परिणाम घरांच्या किंमतीवर होऊन घरांच्या किंमती वाढणार आहेत.

Web Title :-  Pune Ready Reckoner Rate | the price of houses in the city will increase due to the possibility of increase in the rate of ready reckoner in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी; राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ

BJP MLA Nitesh Rane | राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानात हकलून द्या, आमदार नितेश राणेंचा घणाघात