पुणेकरांनो सावधान ! गेल्या 24 तासात शहरातील ‘कोरोना’च्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ‘लक्षणीय’, 16 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 528 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून दिवसभरात कोरोनामुळं तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 9 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 4 हजार 558 वर गेली आहे. दिवसभरात 415 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 69 हजार 394 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 59 हजार 429 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 507 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 400 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 248 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं वेळोवळी केलं आहे.

You might also like