पुण्यात गरज असणार्‍यांना घरपोच मोफत मिळणार Oxygen कॉन्सन्ट्रेटर, जाणून घ्या अटी व शर्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माणसाची परिस्थिती बिकट झाली आहे. सतत वाढणाऱ्या रुग्णाची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण तसेच प्राणवायूचा अपुरा पुरवठा झाला आहे. अनेक लोक मृत्यू पडलेले आहे. अशी परिस्थिती पाहता पुणे महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेत. गरज असल्यास नागरिकांना घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करण्याची मोहीम राबवली जाणार आहे.

ज्या रुग्णांना घरी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासते अशांसाठी काही अटी व शर्ती निश्चित करून पुणे महापालिकेकडून त्यांना विनामूल्य ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी दिला जाणार आहे. असा उपक्रम पुणे मनपाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अटी आणि शर्ती दिल्या आहेत. ते म्हणजे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णाची राहणाऱ्या पत्त्यासह पूर्ण माहिती आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून झाल्यानंतर पुन्हा उत्तम स्थितीत परत करण्यासाठीचा हमीपत्र, इतक्या गोष्टींच्या आधारावर विनामूल्य हे प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

या दरम्यान, पुणे महानगरपालिकेने एक अभिनव उपक्रमाद्वारे पुणे मनपाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राप्त झाले आहेत. याबाबत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना केली. हे प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर रुग्णांना घरी अथवा रुग्णालयात वापरासाठी नेता येणार आहे. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी अथवा रुग्णालयात ७ दिवस १५ दिवस अथवा ३० दिवस विविध कॅपॅसिटीचा उदा. ५ लिटर अथवा १० लिटरचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यास देण्यात येणार आहे.