Pune RTO | गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune RTO | वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक करू नये आणि गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे (Pune RTO) यांनी केले आहे.

 

वाळू, माती, मुरुम, खडी आदी गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर आच्छादन नसल्यास वाळू खडी सांडत असते. त्यावरून इतर वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वाहनातून उडणारे धुलीकण मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांमध्ये जात असल्याने अपघात होतात. (Pune RTO)

 

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 133 नुसार भार क्षमतेपेक्षा अधिक माल असलेले वाहन चालविणे,
ते चालविण्यास प्रवृत्त करणे किंवा ते चालविणे हा गुन्हा आहे.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात येणार
असून रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने वाहनचालकांनी सूचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune RTO | Call for tarpaulin covering while transporting minor mineral

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका’, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात

Ajit Pawar | संभाजीनगर राड्यात राष्ट्रवादीचा हात, अजित पवार भाजप खासदारावर संतापले, म्हणाले-‘वेगवेगळ्या पक्षांची नावं घेण्यापेक्षा चौकशी करा, होऊन जाऊ द्या…’