Shambhuraj Desai | ‘बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका’, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे उद्धव ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वडिल जरुर असतील. पण, राष्ट्रीय पुरुष आहेत. एका ठाकरे परिवारापुरते ते मर्यादित नाहीत. संपूर्ण हिंदुस्तानातील हिंदूंचे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांना कुटुंबा पुरते मर्यादित ठेवू नका. त्यामुळे कोणी कोणाच काय चोरले, असे बोलणे उद्धव ठाकरेंच्या मुखात शोभत नाही, असा टोला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी लगावला. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सोमवारी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथील सभेत भाजप (BJP) आणि शिवसेना Shivsena (शिंदे गट) यांच्यावर टीका, टोमणे याशिवाय काही नव्हतं. राज्याच्या हिताचं काय होते? त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय केलं, याची माहिती दिली का? शिवसेना आणि भाजपाच्या द्वेषाने पछाडलेली सभा, याच्या व्यतिरिक्त काही बोलले नाहीत, अशी टीका शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरेंवर केली.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे कौटुंबिक वारसदार आहेत. मात्र करोडो हिंदू जनता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करते. त्या प्रत्येकाचा बाळासाहेब ठाकरेंवर अधिकार आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आणि संकुचित ठेऊ नये. त्यामुळे कोणी कोणाचं काय चोरले असे बोलणे उद्धव ठाकरेंच्या मुखातून शोभत नाही. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर बोलताना शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शैक्षणिक पदवीबाबत टीका केली होती.
या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना टिव्हीवर दाखवायचं कमी करा.
तुम्ही पत्रकार मंडळींनी स्वत: सर्वे करा. संजय राऊत बोलायला लागले की लोक चॅनल बदलतात.
मी स्वत:च एक सर्वे करतो, असे सांगून तुम्ही संजय राऊतांना टिव्हीवर दाखवणं बंद करा,
अशी विनंती शंभूराज देसाई यांनी माध्यमांना केली.

Web Title :-   Shambhuraj Desai | Balasaheb Thackeray is a national man, for the family…, Shambhuraj Desai’s criticism of Uddhav Thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rahul Gandhi | राहुल गांधींना सूरत कोर्टाकडून जामीन मंजूर, खासरदारकी पुन्हा मिळणार?

Ajit Pawar | संभाजीनगर राड्यात राष्ट्रवादीचा हात, अजित पवार भाजप खासदारावर संतापले, म्हणाले-‘वेगवेगळ्या पक्षांची नावं घेण्यापेक्षा चौकशी करा, होऊन जाऊद्या…’

Devendra Fadnavis | ‘फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा’, भाजपच्या माजी मंत्र्याचं भरसभेत अजब विधान