Pune : पुण्याच्या भोर तालुक्यातील दुमजली फार्महाऊसमध्ये ‘डान्सबार’ ! 13 जणांना पकडलं, पुण्यातील ‘शोकीन’ मंडळींचा सहभाग; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोर तालुक्यातील केळवडे गावाच्या परिसरात एका फार्म हाऊसमध्ये भरवण्यात आलेल्या डान्सबारवर (Dancebar) पोलिसांनी छापा टाकला. येथून 13 जणांना पकडले आहे. पैशाची उधळण करत हा डान्सबार (Dancebar) रंगला होता. पण, रंगात येताच राजगड पोलिसांनी येथे छापीमारी केली. येथून 6 मुलींची सुटका केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आणि डान्सबार (Dancebar) बंद झाल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात खासगी इमारतीत अशा डान्सबारचे (Dancebar) पेव फुटले आहेत.

याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात सागर रमेश जाधव (वय 32, रा. खडकवासला कॅनॉल शेजारी, हवेली), सुनील निवृत्ती पाठक (वय 33, रा. दत्तनगर, गणेश मंदिराशेजारी धनकवडी, पुणे), विकी वसंत शेलार (वय 22, रा. केळवडे, ता. भोर), गणेश विजय कदम (वय 33, रा. पद्मावती मंदिराशेजारी पद्मावती, पुणे), अविनाश संजय साखरकर (वय 24, रा. विश्रांतवाडी घोलप वस्ती गणेश मंदिराजवळ, पुणे), विशाल गणेश पासलकर (वय 38, रा. निलगिरी कंपाऊंड आंबेगाव पठार, पुणे), सचिन लक्ष्‍मण शिंदे (वय 37, रा. धनकवडी पोलीस चौकी शेजारी, फाईव्हस्टार सोसायटी पुणे) यांना पकडले आहे. तर पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 5 व ठाणे जिल्ह्यातील एका मुलीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरील सुमित प्रकाश साप्ते (रा. गाऊडदरा, ता. हवेली) यांच्या दुमजली फार्म हाऊसवर रंगीबेरंगी लाईट आणि डीजेच्या कर्रररकश आवाजात तरुण-तरुणीचा डान्स सुरू आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. याची माहिती राजगड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी या फार्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी या मुलांना आणि 6 मुलींना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

त्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व उपाययोजनांचा भंग केल्याने त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्यासह उपनिरिक्षक श्रीकांत जोशी, हवालदार एस. एन. कार्लेकर, गायकवाड, श्रीमती एस. आर. कुतवळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जोशी करत आहेत.

 

Also Read This : 

 

मुंबई : मॉडेलवरील बलात्कार प्रकरणी 9 जणांवर FIR दाखल; निर्मात्याचा पुत्र, अभिनेता, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर, फोटाग्राफरचा समावेश

 

‘हे’ ५ घरगुती उपाय करा..ब्लॅकहेड्सपासून मुक्त व्हा

 

आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा ‘हे’ 8 घरगुती उपाय, जाणून घ्या

 

Pravin Darekar : ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी, शरद पवार यांनी त्यांच्या हाताखाली काम करावं’

 

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या