
पुण्यातील ससून रुग्णालयात ‘कोरोना’बाधित महिलेची यशस्विरित्या प्रसूती
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र अशातच एक चांगली बातमी आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वीरीत्या प्रसूती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, २५ वर्षीय या महिलेच्या बाळाचे वजन ३.५ किलो आहे. बाळ एकदम ठणठणीत असून बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. मात्र बाळाच्या आईला कोरोनाची बाधा झाल्यामुळे याचा बाळाला संसर्ग होऊ नये याकरीता विशेष खबरदारी घेतली जातात असून बाळाला पुढील काही दिवस शीशु कक्षात ठेऊन उपचार केले जाणार आहेत. याबद्दल महापौरांनी ससूनच्या डॉक्टरांच्या टीमचे आभिनंदन केले आहे.
Good News : कोरोनाबाधित महिलेची प्रसूती; बाळ ठणठणीत !
ससून रुग्णालयात एका २५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेने एका बाळाला जन्म दिला असून बाळाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. बाळाचे वजन ३.५ किलो आहे तर आई कोरोनाबाधित असल्याने बाळावर पुढचे काही दिवस नवजात शिशुकक्षात उपचार होणार आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 20, 2020
दरम्यान , कोरोनाच्या संकटातील जगातील ही सातवी प्रसूती ठरली. यापूर्वी चीन, लंडन, ऑस्ट्रोलिया, मुंबई, औरंगाबाद आणि धुळे अशी प्रसूती करण्यात आली होती. कोरोना झालेल्या महिलेचीही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पुण्यात आज दुपारी दोन पासून “कडेकोट कर्फ्यु” लागू
शहरात संचारबंदी असताना देखील वाढती संख्या पाहता पोलिसांनी आज दुपारी दोन पासून “कडेकोट कर्फ्यु” लागू करण्यात आला आहे. शहरात अत्यावश्यक सेवाचे देखील दुकान काही तासासाठी उघडी राहणार असून, त्यात ऑनलाइन आणि घरपोच सेवा देणाऱ्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता पुणे पोलिसांनी दिलेले पासेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात आता याची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.