पुण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलाचा प्रवासादरम्यान मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहर पोलीस दलातील फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंडे यांच्या मुलाचा आजारपणामुळे लातूर ते पुणे प्रवासादरम्यान मृत्यू झाला.

पोलीस अधीक्षकांना (SP) भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या (Sr.PI) गाडीला अपघात

किशोर नावंडे हे पुणे शहर पोलीस दलातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी या पूर्वी लातूर, सोलापूर आणि नांदेड येथे प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यांचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून टायफाईड आजाराने आजारी होता. त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरु होते. मात्र, त्या ठिकाणी त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला पुण्यात आणण्यासाठी नावंडे हे लातूरला गेले होते. लातूरहून पुण्यात उपचारासाठी घेऊन येत असताना आज पहाटे लातूर ते पुणे प्रवासादरम्यान त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध