Updated News : पुण्याजवळ शिवशाहीसह १० बस जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये लागलेल्या भीषण आगीत शिवशाही बससह ८ ते ९  खासगी गाड्या जळून खाक झाल्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पुणे -सातारा रोडवर शिंदेवाडी येथे एका गॅरेजमध्ये बसच्या बॉडी बाधण्याचे काम चालते. या गॅरेजमध्ये अनेक बसगाड्या उभ्या केल्या होत्या. त्यांना बुधवारी सकाळी अचानक आग लागली. अग्निशामक दलाला सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी याची खबर मिळाली. त्यानंतर तातडीने २ फायरगाड्या, २ वॉटर ब्रॉऊझर घटनास्थळी रवाना झाल्या. काही वेळातच आगीने भीषण रुप धारण केले. आगीमुळे निर्माण झालेला धूर लांबवरुन दिसत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत शिवशाही बससह ८ ते ९ बस पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.

याशिवाय तेथील आणखी काही बसना आगीची झळ पोहचली आहे. आता आग पूर्णपणे विझली असून कुलिंगचे काम सुरु आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
You might also like