Pune Shivajinagar Covid Center Case | उद्धव ठाकरे, लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, किरीट सोमय्यांची मागणी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Shivajinagar Covid Center Case | कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला (Life Line Company) उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याच दरम्यान कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्या पर्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लाइफलाइन कंपनीविरोधात (Pune Shivajinagar Covid Center Case) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे (Pune Police) केली आहे.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांचे पार्टनर सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांच्या लाइफलाइन कंपनीला कोरोना काळात शिवाजीनगर (Pune Shivajinagar Covid Center Case) येथे कोवीड सेंटर उभारण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी ती कंपनी अस्तित्वात नव्हती. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमआरडीएच्या (PMRDA) अधिकाऱ्यांनी हे काम संबंधित कंपनीला दिले. त्यावेळी कशा प्रकारे बीलं दिलं जात होती, ते आपण सर्वांनी पाहिले आहे.

दरम्यान शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमधील शंभर रुग्णांचे शारीरिक नुकसान झाले आहे. काहींची किडनी खराब झाली, तर काहींना हृदयचा त्रास सुरु झाला. तसेच काही रुग्णांचा मृत्यू देखील झाला. हा सगळा प्रकार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले. यानंतर या कंपनीला ब्लॅक लिस्ट (Black List) करण्यात आले, असे सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या पुढे म्हणाले, लाइफलाइन कंपनी ही ब्लॅक लिस्ट केली होती.
मात्र त्यावेळी संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकराचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही.
तरी देखील उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी
वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले.
एका बाजूला तीच कंपनी ब्लॅक लिस्ट होते आणि दुसऱ्या बाजूला काम दिले जाते.
त्यामुळे या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

Web Title :  Pune Shivajinagar Covid Center Case | a case of culpable homicide should be filed against uddhav thackeray and life line company in shivajinagar covid center case demand kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP Supriya Sule | अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला