Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने कॉलेज तरुणीला भररस्त्यात कानशिलात लगावत तिच्या सोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी धनकवडी येथील तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मॉर्डन कॉलेज जवळील फुटपाथवर घडला आहे. (Pune Shivajinagar Crime)

याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.21) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चेतन बाजीराव चव्हाण Chetan Bajirao Chavan (वय-22 रा. समर्थ कॉम्पलेक्स, धनकवडी) याच्यावर आयपीसी 354, 354(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीने चेतन याला तू मला फोन करु नकोस तसेच माला भेटू नकोस असे सांगितले. मात्र, त्याने मुलीला वारंवार फोन करुन बोलण्याचा प्रयत्न करुन कॉलेज बाहेर येऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी दुपारी पीडित तरुणी कॉलेज जवळ असलेल्या फुटपाथवर थांबली होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने मुलीसोबत बोलण्याचा बहाणा करुन जोर जोरात ओरडून म्हणाला, कोण आहेत ते तुझे मित्र, ते माझी बदनामी का करतात. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने सर्वांसमोर तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मुलीचा हात पकडून तिच्या कानशीलात लगावली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तो भोंदू महाराज, मनोज जरांगेंचा अरोप