पुणे शहर सायकलींचे शहर पुन्हा ओळख व्हावी : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराची एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख होती.या शहराची पुन्हा पुणे शहर सायकलींचे शहर अशी ओळख व्हावी याकरिता पुणे मनपाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांकडून सायकलींच्या वापरात वाढ व्हावी या प्रसाराकरिता मनपा धोरणानुसार महापालिकेत सायकल क्लब सुरु करण्यात आलेला आहे. सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे हा खरा संदेश देण्याचा उद्देश आहे. सायकल क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सायकल वापरात वाढ व्हावी त्या दृष्टीने अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकचे काम चालू आहे. पुण्याचे पर्यावरण संतुलन व आरोग्यदायी वातावरणात वाढ होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

मा. उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे यांनी सांगितले कि, प्रदूषणमुक्त पुणे शहर करण्याकरिता मनपाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदूषणमुक्त पुणे शहर करण्यासाठी व पर्यावरण संतुलन राखण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालवावी असे त्यांनी याप्रसंगी आवाहन केले.

शनिवारवाडा ते पुणे मनपा मुख्य भावनापर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वतीताई शेंडंगे, सुरेश परदेशी, मंगेश दिघे व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी मनपा मुख्य भवनापर्यंत सायकल चालवली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/